IND V/S NZ | आजपासून भारत-न्यूझीलंडमध्ये जगज्जेतेपदाची कसोटी, अश्विन-जडेजावर फिरकीची भिस्त

आजपासून पुढचे चार दिवस क्रिकेटच्या मैदानात जगजेत्तेपदाची ‘कसोटी’ (WTC Final 2021) खेळविली जाणार आहे. (India vs New Zealand WTC 2021 Match)

मुंबई :  आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे.आजपासून पुढचे चार दिवस क्रिकेटच्या मैदानात जगजेत्तेपदाची ‘कसोटी’ (WTC Final 2021) खेळविली जाणार आहे. साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जगजेतेपदाची गदा उंचावण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) दोघेही आसुसलेले आहेत. आज दुपारी ठीक अडीच वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरुवात होईल. (India vs New Zealand WTC 2021 Match)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI