भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्तांना बोलावलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर, भारताने पाकिस्तानाविरुद्ध राजनैतिक पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसरिया (Ajay Bisaria) यांना मोदी सरकारने बोलावणं धाडलं आहे. अजय बिसरिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना पाकिस्तानातून भारतात बोलावलं आहे. त्याआधी भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावलं. सूत्रांच्या मते, परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांना शुक्रवारी […]

भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्तांना बोलावलं!
Follow us on

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर, भारताने पाकिस्तानाविरुद्ध राजनैतिक पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसरिया (Ajay Bisaria) यांना मोदी सरकारने बोलावणं धाडलं आहे. अजय बिसरिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना पाकिस्तानातून भारतात बोलावलं आहे.

त्याआधी भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावलं. सूत्रांच्या मते, परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांना शुक्रवारी दुपारी 2 वा समन्स बजावलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तीव्र शब्दात सुनावण्यात आलं. पाकिस्तानने जैश ए मोहम्मदविरोधात कडक कारवाई करावी असं भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांना सुनावलं.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यात CRPF चे जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत. यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तर भारताच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानी उच्चायुक्तांना नोटीस बजावली आहे. त्याचवेळी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू काश्मीरमधील पुलवामात दाखल झाले.

राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला स्वत: खांदा दिला. एखाद्या गृहमंत्र्याने शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर जवानांचं पार्थिव तिरंग्यात लपेटून त्यांच्या त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आलं. मात्र त्याआधी जवानांसह राजनाथ सिंह यांनी शहिदांना अखेरचा सलाम करत, त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला.

संबंधित बातम्या 

जवानांच्या पार्थिवाला गृहमंत्री राजनाथ सिंहांचा खांदा   

घरात दीड वर्षांचा अपंग मुलगा, म्हातारा बाप… 26 वर्षीय रमेश यादव शहीद!  

गंभीरचा संताप, सेहवागची हळहळ, सलमान,आमीर, शाहरुखची श्रद्धांजली 

पाकड्या कलाकारांना रोखा, मनसेचा अटीतटीचा इशारा