साऱ्यांना भावला भारतीय सैनिकाचा हा व्हिडीओ, Anand Mahindra म्हणाले यापेक्षा सुंदर काहीच नाही

सैनिक ऊन, पाऊस आणि हाडं गोठविणाऱ्या थंडीतही सीमेवर शत्रूंवर नजर ठेवून असतात. त्यामुळे आपण सुखाने राहू शकतो. एका सैनिकाचा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

साऱ्यांना भावला भारतीय सैनिकाचा हा व्हिडीओ, Anand Mahindra म्हणाले यापेक्षा सुंदर काहीच नाही
indian soldier
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 16, 2023 | 6:36 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला सारा देश सलाम करीत असतो. सैन्यात आपले सैनिक डोळ्यात तेल घालून तैनात असल्यानेच आपण सुखाने झोपू शकतो. अशा सैनिकांच्या घरातील आप्तस्वकीय त्यांच्या मुलाची चातकाप्रमाणे वाट पाहात असतात. मुलगा सीमेवर तैनात असतो. महिनोमहिने त्याचे दर्शन होत नाही. मग जेव्हा सुट्टीवर जेव्हा त्यांचा मुलगा येतो तेव्हा घरात अगदी दिवाळी, बैसाखी आणि ईदचे वातावरण असते. तर हा व्हिडीओ पाहातच राहावे असा सुंदर आहे.

सैनिक ऊन, पाऊस आणि हाडं गोठविणाऱ्या थंडीतही सीमेवर शत्रूंवर नजर ठेवून असतात. त्यामुळे आपण सुखाने राहू शकतो. अशाच एका बहादूर सैनिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुट्टीवर घरी आलेल्या मुलाच्या स्वागतासाठी त्याचे आई-वडील, बहीणी किती अधीर झालेत ते पाहून तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. या व्हिडीओला पाहून दिग्गज उद्योजक आनंद महिंद्र देखील भावूक झाले. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंट वरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्र यांनी या आर्मी जवानाच्या कुटुंबियांना सॅल्यूट केले आहे. आनंद महिंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की जर तुम्ही भारतीय नागरिक आणि आमची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांदरम्यानचे भावनिक नाते समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ शिवाय इतर काही पाहूच नका, या कुटुंबाला मी सलाम करतो !

आनंद महिंद्र यांनी शेअर केलेला भारतीय जवानाचा व्हिडीओ –

व्हिडीओत काय आहे ?

या व्हिडीओत भारतीय सैन्याचा जवान गाडीतून उतरून गावातील आपल्या घराच्या दिशेने चालत जात आहे. कुटुंबिय पंचारती घेऊन त्याची नजर काढून ओवाळण्यास सज्ज झाले आहेत. लहान मुले, बुजुर्ग मंडळी काही महिला दाराच्या उंबरठ्यावर नजरेत प्राण आणून त्याची वाट पाहात आहेत. भारतीय जवानाच्या स्वागतासाठी घरच्यांनी रेड कार्पेट अंथरले आहे. घराच्या दारात वेलकम बॅक होम अशी रांगोळी काढली आहे. जवान घरी पोहताच सर्वजण त्याला आळीपाळीने गळाभेट घेतात. बुजुर्गांचे पायाला हात लावून सैनिक जवान आशीर्वाद घेताना दिसत आहे. हा सैनिक जवानही सॅल्यूट करतो तेव्हा घरातील कुटुंबिय आणखीनच भावूक होताना दिसत आहेत.