AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sydney Test, Day 3: पुजारा आणि पंतवर भारताची मदार, पहिल्या डावात भारत अद्याप 158 धावांनी पिछाडीवर

काल सावध सुरुवात करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आज आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु पॅट कमिंसच्या गोलंदाजीसमोर त्याचा टिकाव लागला नाही. सकाळच्या सत्रात भारताने झटपट दोन विकेट गमावल्या.

Sydney Test, Day 3: पुजारा आणि पंतवर भारताची मदार, पहिल्या डावात भारत अद्याप 158 धावांनी पिछाडीवर
| Updated on: Jan 09, 2021 | 7:36 AM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Team India vs Australia 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंटवर खेळवला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सध्या सुरु आहे. काल खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचे चेतेश्वर पुजारा (9) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (5) धावांवर नाबाद होते. दुसऱ्या दिवसअखेरपर्यंतच्या 2 बाद 96 वरुन भारताने आज सकाळी सुरुवात केली. काल सावध सुरुवात करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आज आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु पॅट कमिंसच्या गोलंदाजीसमोर त्याचा टिकाव लागला नाही. सकाळच्या सत्रात भारताने झटपट दोन विकेट गमावल्या. टीम इंडियाने आधी रहाणे (22) आणि मग हनुमा विहारी (04) यांच्या विकेट गमावल्या. त्यानंतर लंच ब्रेकपर्यंत भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने भारताचा डाव सावरला आहे. दोघांनीही खेळपट्टीवर चांगलाच जम बसवला आहे. (INDvsAUS: Cheteshwar Pujara and Rishabh Pant score in the middle of Sydney Test)

आघाडीचे चार फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताची पूर्ण मदार आता चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या दोघांच्या खांद्यावर आहे. पुजारा सावधपणे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करतोय तर पंतने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली आहे. पुजारा सध्या 42 तर पंत 29 धावांवर खेळत आहेत. भारताने आतापर्यंत 79 षटकांमध्ये 4 गड्यांच्या बदल्यात 180 धावा फलकावर लावल्या आहेत. टीम इंडिया अद्याप 158 धावांनी पिछाडीवर आहे. मागील दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या पुजाराने आता खेळपट्टीवर चांगलाच जम बसवला आहे. तर पंतने काही आक्रमक फटके खेळून ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सातत्याने गोलंदाजीत बदल करण्यास भाग पाडले आहे. लंचपूर्वीच्या पाच षटकांमध्ये दोन्ही फलंदाजांनी विकेट गमवायची नाही या हेतूने सावध फटके खेळत अवघ्या 12 धावा जोडल्या.

दरम्यान, लंचनंतर दोन्ही संघ मैदानात उतरतील तेव्हा एक षटक झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या हातात नवा चेंडू दिला जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा जलदगती गोलंदाज गोलंदाजीसाठी येतील. त्यामुळे पुजारा आणि पंतची जोडी मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिंस या ऑस्ट्रेलियन तोफखान्याचा सामना कसा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, काल (शुक्रवार) टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी आली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शुभमन आणि रोहित दोघेही सेट झाले. मात्र रोहितला हेझलवूडने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. रोहितने 77 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावा केल्या.

रोहितनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पुजारासह गिलने स्कोअरबोर्ड हलता ठेवला. या दरम्यान गिलने शानदार अर्धशतक झळकावलं. मात्र अर्धशतकी खेळीनंतर गिल आऊट झाला. गिलने 101 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा केल्या. गिलनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही ओव्हर शिल्लक होत्या. यामुळे रहाणे-पुजारा या जोडीने संथ खेळ केला. या पुजारा आणि रहाने या दोघांनी दिवसखेर नाबाद प्रत्येकी 9 आणि 5 धावा केल्या होत्या. परंतु आज सकाळच्या सत्रात भारताने रहाणे आणि त्यापाठोपाठ हनुमा विहारीची विकेट गमावली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 338 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 131 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेनने 93 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतला.

संबंधित बातम्या : 

Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट

प्राण जाये पर वचन न जाये ! मराठमोळ्या क्रिकेटवेड्याने शब्द पाळला, पैज हरल्याने अर्धी मिशी काढली!

Ind vs Aus : कांगारुंना हरवायचं तर किती रन्स पाहिजे?, अजय जडेजाने सांगितला एक्झॅट आकडा!

(INDvsAUS: Cheteshwar Pujara and Rishabh Pant score in the middle of Sydney Test)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.