US Presidential Election: जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग आणखी खडतर, निवडणुकीचा वाद सुप्रीम कोर्टात?

जो बायडन यांना 264 इलेक्ट्रोल वोट्स मिळाले तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 वोट्स मिळाले आहेत. दोन दिवसांच्या मतमोजणीनंतर जो बायडन यांना विजयासाठी 6 मतांची गरज आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयाचा मार्ग खडतर झाला आहे. (Joe Biden reach near victory trump have many problems in path of victory )

US Presidential Election: जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग आणखी खडतर, निवडणुकीचा वाद सुप्रीम कोर्टात?
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 8:34 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु अजूनही सुरु आहे. मतमोजणीमध्ये सुरुवातीला जो बायडन यांनी मोठी आघाडी घेत ते विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार जो बायडन यांना 264 इलेक्ट्रोल वोट्स मिळाले तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 वोट्स मिळाले आहेत. दोन दिवसांच्या मतमोजणीनंतर जो बायडन यांना विजयासाठी 6 मतांची गरज आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयाचा मार्ग खडतर झाला आहे. (Joe Biden reach near victory trump have many problems in path of victory )

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता वेगळ वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जो बायडन यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. जो बायडन यांनी जोरदार मुसंडी मारत विस्कॉन्सिन,मिशिगन या राज्यांमध्ये विजय मिळवला. नेवादा या स्विंग स्टेटमध्ये त्यांना 6 मतं मिळाल्यास ते विजयी होऊ शकतात. नेवादामधून बायडन आघाडीवर आहेत.

पेन्सिल्वेनिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. दोन्ही रांज्यांमध्ये मिळून 35 इलेक्ट्रोल व्होटस आहेत. जॉर्जियामध्ये बायडन आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. इथेही ट्रम्प आघाडीवर आहेत. पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जिया मधील सर्व मतं मिळाली तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊ शकतो. त्यांना नेवादामधील 6 मतं मिळवण्याची गरज आहे. नेवादामध्ये बायडन आघाडीवर आहेत.

बायडन यांचा विजयाचा दावा

दोन दिवसांनतरही लाखो मतांची मोजणी सुरु आहे. बायडन यांना 7.1 कोटी मतं मिळाली आहेत. बायडन यांना मिळालेली मतं इतिहासातील सर्वाधिक आहेत. बुधवारी बायडन यांनी विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला होता.

फेसबूक ट्विटरचा ट्रम्प यांना दणका

ट्रम्प यांनी फेसबुक पोस्टमध्ये ‘आपण मोठ्या संख्येने आहोत. पण विरोधक निवडणुकीचे निकाल प्रभावित करु पाहत आहेत. आपण त्यांना असे करु देणार नाही.’ असं  म्हटलं आहे. ट्रम्प यांनी ही पोस्ट करताच फेसबुकने त्यांना चांगलाच झटका दिला आहे. फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टवर लेबल लावले आहे. यामध्ये ‘निकालाचे निष्कर्ष सुरुवातीच्या मतमोजणीपेक्षा वेगळे असू शकतात. बॅलेटमार्फत मतदान केलेल्या मतांची मोजणी अजूनही सुरु आहे. त्यासाठी किमान काही आठवडेही लागू शकतात,’ असं फेसबुकने सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरही अशाच आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर ट्विटरनेदेखील त्यांच्या ट्वीटला लेबल लावत ट्वीटमधील काही दावा विवादित असू शकतो, असं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

US Election 2020 : ‘विजेत्याची घोषणा करणं मतदारांचं काम’, निकालापूर्वीच बायडन-ट्रम्पमध्ये ट्विटर वॉर

Joe Biden | ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

(Joe Biden reach near victory trump have many problems in path of victory )

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.