ऑस्ट्रेलियाचा नवा ‘ग्लेन मॅक्ग्रा’, पदार्पणातच ज्याने वडिलांच्या मित्रांना लखपती बनवलं!

| Updated on: Jan 08, 2021 | 11:30 AM

त्या मुलाच्या वडिलांच्या मित्रांना खात्री झाली होती की, तो केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातच खेळणार नाही तर कसोटी क्रिकेटपटूदेखील होईल.

ऑस्ट्रेलियाचा नवा ग्लेन मॅक्ग्रा, पदार्पणातच ज्याने वडिलांच्या मित्रांना लखपती बनवलं!
Follow us on

सिडनी : एका ऑस्ट्रेलियन मुलाला क्रिकेटपटू व्हायचं होतं. तो दिवसरात्र क्रिकेटच्याच फिवरमध्ये असायचा. हे पाहून त्या मुलाच्या वडिलांच्या मित्रांना खात्री झाली होती की, तो केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातच खेळणार नाही तर कसोटी क्रिकेटपटूदेखील होईल. परंतु त्या मुलाच्या वडिलांना हे पटत नव्हतं. तो मुलगा थोडा मोठा झाला, अधिक चांगलं क्रिकेट खेळू लागला. त्यावेळी त्या मुलाच्या वडिलांच्या मित्रांनी मुलाच्या वडिलांशी पैज लावली की, तुझा मुलगा कसोटी क्रिकेटसुद्धा खेळेल. (Australia’s new ‘Glenn McGrath’, who made his father’s friends millionaires in his debut!)

त्या मुलाच्या वडिलांच्या मित्रांनी इंग्लंडमधील जुगाराशी संबंधित एका कंपनीत एक पैज लावली. पैज अशी होती की, हा मुलगा 30 वर्षांचा होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळेल. पैज म्हणून त्यांनी 82 डॉलर्स लावले. म्हणजे आजच्या तुलने 6036 भारतीय रुपये.कंपनीने त्यावेळी सांगितले की, पैज जिंकलात तर तुम्हाला एका डॉलरमागे 50 डॉलर्स मिळतील.

पुढे त्या मुलाने 2014 साली ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा तो केवळ 23 वर्षांचा होता. तो ऑस्ट्रेलियाचा 440 वा कसोटी खेळाडू ठरला. ग्लेन मॅक्ग्राने त्याला टेस्ट कॅप दिली होती. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी ती पैज जिंकली. ते सर्वजण लक्षाधीश झाले. जोश हेजलवुड (Josh Hazlewood)असे या खेळाडूचे नाव आहे. आज हेजलवुडचा वाढदिवस आहे. 8 जानेवारी 1991 रोजी न्यू साउथ वेल्समध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूने आतापर्यंत 53 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 202 बळीही मिळवले आहेत. (Josh hazlewood birthday 8 January 1991 in new south wales Australia)

हेझलवुडने कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू करण्यापूर्वी चार वर्ष आधीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 25 व्या वर्षापर्यंत त्याने 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी संधी मिळाली, कारण त्याच्यावर कसोटी क्रिकेटपटूचा शिक्का बसला होता. 2014 मध्ये ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले. या सामन्यात त्याने भारताचे सात गडी बाद केले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2015 मध्ये त्याने प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत 15 बळी घेतले. त्यानंतर त्याने पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात न्यूझीलंडविरोधात 70 धावा देऊन 6 विकेट घेत विजयाचा पाया रचला. तेव्हापासून हेझलवूड कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा अविभाज्य बनला आहे.

मॅक्ग्राच्या पावलावर पाऊल

वयाच्या 17 व्या वर्षी हेझलवुड न्यू साउथ वेल्स संघाचा भाग बनला. न्यू साऊथ वेल्स संघाकडून खेळणारा तो सर्वात तरुण गोलंदाज आहे. हेझलवुडची उंची सहा फूट आणि चार इंच इतकी आहे. तो गोलंदाजी करताना त्याच्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतो. त्याच्याकडे जास्त गती नाही. परंतु ग्लेन मॅक्ग्राप्रमाणे तोदेखील परफेक्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतो. तसेच एकाच लेंथवर सातत्यपूर्ण गोलंदाजी करु शकतो. लहानपणीच त्याला मॅक्ग्रासारखे व्हायचे होते. विशेष म्हणजे मॅक्ग्रानेच त्याला टेस्ट कॅप दिली होती. योगायोग इथेच संपत नाहीत. दोघांनीही वयाच्या 23 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हेझलवूडने 46 तर मॅक्ग्राने 45 डावात 100 कसोटी बळी घेतले.

हेही वाचा

प्रत्येक सामन्यात कॅच सोडणारच, ऋषभ पंतने लाज आणली, नकोसा विक्रम

आयपीएलच्या आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता

(Josh hazlewood birthday 8 January 1991 in new south wales Australia)