पतीची प्रेयसीवर उधळपट्टी, संतप्त पत्नीचा ‘तिच्या’वर प्राणघातक हल्ला

पत्नीने पतीच्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली.

पतीची प्रेयसीवर उधळपट्टी, संतप्त पत्नीचा 'तिच्या'वर प्राणघातक हल्ला
Nupur Chilkulwar

|

Oct 23, 2020 | 11:37 PM

कल्याण : पती कमावलेला पैसा घरी न देता प्रेयसीला देतो, या संशयावरुन (Wife Attack Husbands Girlfriend) पत्नीने पतीच्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या पत्नीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे (Wife Attack Husbands Girlfriend).

प्रिया जाधव असं हल्ला करणाऱ्या पत्नीचं नाव आहे. तर अनिता राज असं प्रेयसीचं नाव आहे. आज कल्याणजवळील आंबिवली येथील अटाळी परिसरात राहणाऱ्या प्रिया जाधवने अनिताचा पाठलाग सुरु केला. आंबिवलीहून प्रिया अनिताचा पाठलाग करत होती. जेव्हा अनिता कल्याण स्टेशन समोर असलेल्या साधना हॉटेलजवळ आली तेव्हा अचनाक प्रियाने अनितावर कोयत्याने डोक्यावर वार केला. अनिताही मागे फिरल्यानंतर परत प्रियाने तिच्यावर वार केला. या हल्ल्यात अनिता जखमी झाली.

यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरीकांनी प्रियाला पकडलं आणि जखमी अनिताला रुग्णालयात नेण्यात आलं. या प्रकरणी प्रिया जाधवला पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया जाधवचा पती शीवदास जाधव याचे अनिता राजसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला आहे, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नागेश कदम यांनी दिली.

शिवदास त्याची सगळी कमाई अनितावर खर्च करतो, असं प्रियाला वाटतं. याचा राग मनात ठेवून प्रियाने अनितावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी प्रियाला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Wife Attack Husbands Girlfriend

संबंधित बातम्या :

वाहनातील ऑईल गळत असल्याचा बनाव, बँकेसमोरुनच 25 लाखांची रोकड लंपास

पुणे, कोल्हापूरला जाणाऱ्या टेम्पोतून 800 किलो चांदीच्या विटा-बिस्किटं जप्त, वाशी पोलिसांची मोठी कारवाई

कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें