पुणे, कोल्हापूरला जाणाऱ्या टेम्पोतून 800 किलो चांदीच्या विटा-बिस्किटं जप्त, वाशी पोलिसांची मोठी कारवाई

डीसीपीचे विशेष पथक यांनी वाशी टोलनाकामध्ये टेम्पोला तपास करताना त्यांना चांदीच्या विटा आणि बिस्किटे आणि काही दागिने आढळून आले.

पुणे, कोल्हापूरला जाणाऱ्या टेम्पोतून 800 किलो चांदीच्या विटा-बिस्किटं जप्त, वाशी पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबई : मुंबईवरुन पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पो मधून 800 किलो चांदीच्या विटा (Silver Bricks And Biscuits Seized) आणि बिस्किटे जप्त करण्यात आल्या आहेत. यादरम्यान, चांदीच्या विटा, पैंजन, ताट, वाट्या, दिवे आदी जप्त केली असून या अधिकृत आहे की नाही, याबाबत राज्य वस्तू व कर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे (Silver Bricks And Biscuits Seized).

मुंबईवरुन पुणे आणि कोल्हापूर येथे टेम्पोतून अवैधरित्या चांदीची वाहतूक होणार असल्याची माहिती झोन 1 चे डीसीपी सुरेश मेंगडे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने वाशी पोलिसांच्या मदतीने वाशी टोलनाका परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पद टेम्पो पिकअप अडवून चौकशी केल्यानंतर त्यामध्ये चांदीच्या विटा, बिस्किटे आणि विविध प्रकारच्या बस्तू आढळून आली.

वाशी पोलिसांनी कोंकण भवनमध्ये असलेल्या राज्य वस्तू व कर विभागाचे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या चांदीच्या बिलांची चौकशी सुरु असून अहवालानुसार पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.

मुंबई काळबादेवीमधून एका टेम्पोमधून या चांदीच्या विटा नेल्या जात होत्या. हा चांदीच्या कांसाईनमेन्ट कुठे जाणार होता त्याची चौकशी वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी करत आहेत.

Silver Bricks And Biscuits Seized

संबंधित बातम्या :

कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना

पाणी पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली, प्रवासी महिलेला बेशुद्ध करुन लुबाडलं, लुटारु रिक्षाचालकाला बेड्या

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *