Kangana Ranaut | पोलिसांच्या समन्सनंतर कंगना रनौतची ‘टीवटीव’, पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका!

| Updated on: Oct 22, 2020 | 10:53 AM

मुंबई पोलिसांनी समन्स पाठ्वाल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा ट्विटरवरून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली आहे.

Kangana Ranaut | पोलिसांच्या समन्सनंतर कंगना रनौतची ‘टीवटीव’, पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या केवळ वादांमुळे नाहीतर, तिच्यावर सुरू असलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे चर्चेत आहे. शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल कंगनावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दलही कंगना आणि रंगोलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कंगना आणि तिच्या बहिणीला पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. यावर पुन्हा एकदा ट्विट करत, कंगनाने महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.( Kangana Ranaut Reacted on Mumbai Police notice)

कंगनाचे खोचक ट्विट

मुंबई पोलिसांनी समन्स पाठ्वाल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा ट्विटरवरून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. ‘पेंग्विन सेना…महाराष्ट्राच्या पप्पूप्रोंना क-क-क-कंगनाची खूप आठवण येतेय. काही हरकत नाही, मी लवकरच येते’, अशा आशयाचे खोचक ट्विट तिने केले आहे.कंगनाच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी कंगनाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. या आधीच कंगना तिच्या ट्विटमुळे वादात अडकल्यानंतरही तिची ही अविरत ‘टीवटीव’ सुरूच आहे.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बजावले समन्स

17 ऑक्टोबरला कंगनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले.( Kangana Ranaut Reacted on Mumbai Police notice)

याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी बोलावले आहे. ती सध्या हिमाचलमध्ये तिच्या घरी आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तिला व्हॉट्सअ‍ॅपवरुन चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे (Mumbai Police Notice).

कंगनासह बहिण रंगोलीवरही गुन्हा दाखल

कंगनासह तिची बहिण रंगोली चंडेलच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Kangana Ranaut | ‘इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येतेय’, नव्या एफआयआरवर कंगनाची प्रतिक्रिया!

(Kangana Ranaut Reacted on Mumbai Police notice)