Kangana Ranaut | ‘इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येतेय’, नव्या एफआयआरवर कंगनाची प्रतिक्रिया!

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Kangana Ranaut | ‘इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येतेय’, नव्या एफआयआरवर कंगनाची प्रतिक्रिया!
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 11:37 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Bollywood Actress Kangana Ranaut) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया देता, कंगनाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येते,’ असे खोचक ट्विट तिने केले आहे. (Bollywood Actress Kangana Ranaut reacted on New FIR against her at Bandra Police Station)

कंगनाने नवरात्रीचे फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. ‘नवरात्रीचे व्रत कोण कोण ठेवत आहे? माझादेखील आज उपास आहे. माझ्याविरोधात पुन्हा एकदा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे दिसते आहे की महाराष्ट्रात असलेल्या पप्पू सैन्याला मी फार आवडले आहे. माझी इतकी आठवण काढू नका, मी लवकरच परत येते आहे’, अशा आशयाचे ट्विट करत कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कंगना राणावतसह रंगोली चंडेलविरोधातही गुन्हा दाखल

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होणार आहे. कंगनाने (Bollywood Actress Kangana Ranaut) मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.  या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.( Bollywood Actress Kangana Ranaut reacted on New FIR against her at Bandra Police Station)

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कंगना बॉलिवूडची बदनामी करतेय

‘अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते,’ असे या याचिकेत म्हटले आहे. (Bollywood Actress Kangana Ranaut reacted on New FIR against her at Bandra Police Station)

‘कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केलं आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्वीट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाचं नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात,’ असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केली आहे.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत.

(Bollywood Actress Kangana Ranaut reacted on New FIR against her at Bandra Police Station)

संबंधित बातम्या : 

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.