Kangana Ranaut | कंगना रनौतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश

कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले आहेत. (Bandra Court orders file Police Complaint against Kangana Ranaut)

Kangana Ranaut | कंगना रनौतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले आहेत. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. (Bandra Court orders registration of police complaint against actor Kangana Ranaut)

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होणार आहे. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.  या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .

“अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते,” असे या याचिकेत म्हटलं आहे.

“कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केलं आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्वीट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाचं नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात,” असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केली आहे.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत. (Bandra Court orders registration of police complaint against actor Kangana Ranaut)

संबंधित बातम्या : 

शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *