AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यावरुन कंगनाविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 09, 2020 | 9:54 PM
Share

बंगळुरु : अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यावरुन कंगनाविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत (Court direct police to register FIR against Actress Kangana Ranaut). कर्नाटकमधील तुमकुरच्या न्यायालयाने क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ररमेश नाईल एल. यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

कंगनावर केंद्राच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी याचिकाकर्त्यांनी पुरावे म्हणून न्यायालयासमोर कंगनाचे काही ट्विटही सादर केले होते. या याचिकेत कंगनावर इतरही अनेक आरोप करण्यात आले आहेत.

रमेश नाईल एल. यांनी न्यायालयात याचिका दाखल करत कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेत म्हटलं होतं, “कंगनाने दंगल होण्यासाठी युवकांशी संबंधित चिथावणीखोर वक्तव्यं केली. त्यामुळे कंगनाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 153 अ, 504, 108 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.” न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या मागण्या मान्य करत पोलिसांना कंगनाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कंगना रनौत काय म्हणाली होती?

दरम्यान, शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करणाऱ्या कंगना रनौतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील चांगलीच खरडपट्टी काढली होती. “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनाचा समाचार घेतला होता.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी कंगनावर तिखट शब्दांत हल्ला चढवला होता. “पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा असेल या ठिकाणी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांचा चक्काचूर झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौत सारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही,” असं शेट्टी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

संबंधित व्हिडीओ :

Court direct police to register FIR against Actress Kangana Ranaut

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली