Shivaji Maharaj Statue | बेळगावातील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार, कर्नाटक सरकारचं आश्वासन

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिले आहे.

Shivaji Maharaj Statue | बेळगावातील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार, कर्नाटक सरकारचं आश्वासन

बेळगाव : बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात (Reinstatement Of Shivaji Maharaj Statue) पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत हा निर्णय घेतल्याचं चित्र आहे (Reinstatement Of Shivaji Maharaj Statue).

कर्नाटक प्रशासनाकडून आठ दिवसात परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आठ दिवसात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही, तर नवव्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार, असा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Reinstatement Of Shivaji Maharaj Statue

संबंधित बातम्या :

Shivaji Maharaj | बेळगावात शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, कन्नडीगांचं संतापजनक कृत्य

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI