Viral Video : आता काय म्हणावं? आधी टोल भरण्यास नकार दिला, नंतर हळूच चार्जरच लंपास केला, ‘चिल्लर’दादाची चोरी चर्चेत

एका वाहनचालकाने आधी टोल भरण्यास नकार दिला. परंतु फास्टटॅगने टोल भरून टोल नाक्यावरील चार्जर लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Viral Video : आता काय म्हणावं? आधी टोल भरण्यास नकार दिला, नंतर हळूच चार्जरच लंपास केला, चिल्लरदादाची चोरी चर्चेत
khed shivapur robbery news
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 15, 2026 | 8:45 AM

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोला नाका नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. या टोलनाक्यावर दादागिरी करून टोल चुकवणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक कारणे देऊन काही जण टोल न भरताच पळ काढतात. काही जण ओळखी सांगूनही टोल देण्यास नकार देतात. अशाच प्रकारने टोल भरण्यास नकार देणाऱ्या एका वाहनचालकाची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. या वाहनधारकाची एक घाडचूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने केलेले कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकाचा एक प्रकार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या वाचालकाने खेड शिवापूर टोलनाक्यावर स्थानिक असल्याचे सांगत टोल भरण्यास नकार दिला. मात्र, पुरावा नसल्याने अखेर फास्टॅगद्वारे टोल भरला. टोल भरल्यानंतर त्याने बूथमधील मोबाईल चार्जर चोरल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

खेड-शिवापूर टोलनाक्यावरील लेन क्रमांक 12, बूथ क्रमांक 12 येथे वाहनचालक आला. त्याने स्वत: ला स्थानिक रहिवाली असल्याचे सांगितले. स्थानिक सांगून त्याने टोल भरण्यास नकार दिला. मात्र, स्थानिक असल्याचा कोणताही पुरावा सादर केला नाही. स्थानिक पुरावा सादर न करता त्याने अखेर फास्टटॅगद्वारे टोल भरला.

टोलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाने बूथमधील मोबाईल चार्जर घेऊन गेल्याचा दावा करण्यात येतोय. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ‘चिल्लर’चोरावर कोणती कारवाई झाली का, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्‍यावर भोर, वेल्हा, मुळशी, हवेली आणि पुरंदर या पाच तालुक्यांतील नागरिकांना टोलमाफी मिळते. काही वर्षांपूर्वी ही टोलमाफी मंजूर झाली. या तालुक्यातील नागरिकांकडून टोल वसूल करणाऱ्या कंपनीने ही बाब मान्य केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us