AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20 : सलमान खानच्या शोमध्ये सुष्मिताच्या Ex ची एंट्री ? बिग बॉसमध्ये दिसणार ललित मोदी ?

Bigg Boss 20 : बहुचर्चित 'बिग बॉस'चा नवा सीझन पुन्हा छोट्या पडद्यावर येणार असून सलमान कान पुन्हा होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. सप्टेंबर महिन्यात या रिॲलिटी शो ला सुरूवात होणार असून यावेळी ललित मोदी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.

Bigg Boss 20 : सलमान खानच्या शोमध्ये सुष्मिताच्या Ex ची एंट्री ? बिग बॉसमध्ये दिसणार ललित मोदी ?
बिग बॉस 20 मध्ये ललित मोदीची एंट्री ?
| Updated on: Aug 15, 2026 | 9:58 AM
Share

Bigg Boss 20 : दबंग स्टार, बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) पुन्हा लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. कारण सलमानचा बहुचर्चित रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 20) पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 6 सप्टेंबर 2026 पासून ‘बिग बॉस 20’ची सुरुवात होणार असल्याची चर्चा असून, यंदाच्या सीझनमध्ये नेमकं काय नवीन पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांध्ये आहे. सलमानचं होस्टिंग आणि शोमधील मसाला पाहण्यास चाहते खूप उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, सलमान खानने एका प्रोमोमधून ‘एक्स्ट्रा जीवनदान’चा ट्विस्टही दाखवला आहे. नेहमीप्रमाणे, हा शो सुरू होण्याआधीच संभाव्य स्पर्धकांच्या नावांवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. विविध कलाकार, सोशल मीडिया स्टार्स आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांनंतर आता एका अशा व्यक्तीचं नाव समोर आलं आहे, ज्यामुळे या चर्चेला अचानक वेगळंच वळण मिळालं आहे. कारण आता यामध्ये आता ललित मोदी यांचं नाव समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून मनोरंजनविश्वापर्यंत या चर्चेला चांगलाच रंग चढला आहे.

ललित मोदींच्या नावावर चर्चा ?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 20’च्या निर्मात्यांकडून आगामी सीझनसाठी ललित मोदी यांच्या नावाचा विचार केला जात आहे. Bollywood Bubbleच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती समोर आली आहे. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे ललित मोदी यांना शोमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे ऑफर देण्यात आली आहे किंवा ते स्पर्धक म्हणून निश्चित झाले आहेत, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे सध्या त्यांचं नाव फक्त संभाव्य स्पर्धकांच्या यादीत चर्चेत असल्याचंच मानलं जात आहे. ललित मोदी हे IPLचे माजी चेअरमन म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे ते काही काळ चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची पुन्हा चर्चा

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याने काही वर्षांपूर्वी मोठी चर्चा निर्माण केली होती. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे भाष्य केलं होतं. ललित मोदी यांनी ‘Humans of Bombay’ला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्ती असल्याचे सांगितले होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुष्मिताने त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोठी मदत केली होती. मात्र, दोघांच्या आयुष्यातील अंतर वाढत गेलं आणि अखेर त्यांचे मार्ग वेगळे झाले.

सलमान खानसमोर येणार सुष्मिताचा एक्स ?

ललित मोदी जर खरोखरच ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी झाले, तर या चर्चेला आणखी एक वेगळा ट्विस्ट मिळू शकतो. कारण सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्यात चांगली मैत्री आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची ऑन-स्क्रीन जोडीही प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे ललित मोदी शोमध्ये आल्यास सुष्मिता सेनसोबतच्या त्यांच्या पूर्वीच्या नात्याबाबत सलमान खानकडून काही बोललं जातं का, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय