‘मास्क घालून या, विनाचौकशी गणपती न्या’, रत्नागिरीतील गणेशोत्सवात कोकणी पाट्यांचा बोलबाला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीत विशेष कोकणी पाट्याही दिसू लागल्या आहेत (Kokan Ganeshotsav Special corona boards).

'मास्क घालून या, विनाचौकशी गणपती न्या', रत्नागिरीतील गणेशोत्सवात कोकणी पाट्यांचा बोलबाला

रत्नागिरी : देशभरात महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रातही कोकणच्या गणपती उत्सवाचं वेगळ वैशिष्ट्यं आहे. मात्र, सध्या कोकणासह सर्वज ठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट आहे. त्यामुळे उत्साहात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कोकणातही कोरोनाच्या पाश्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. रत्नागिरीतील गणेश चित्र शाळेत फिजीकल डिस्टन्सिंगचं भान बागळलं गेलंय. याचसाठी विशेष कोकणी पाट्याही दिसू लागल्या आहेत (Kokan Ganeshotsav Special corona boards).

गणेशोत्सव आता काही दिवसांवर आलाय. त्यामुळे गणेशचित्र शाळेत लगबग आहे. मूर्तीकारांची सुबक देखण्या गणेश मुर्ती साकारण्याची लगबग सुरु आहे. त्यामुळे गणेशमूर्ती शाळेत सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जातेय.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

गणेशमुर्ती शाळेंच्या बाहेर सध्या मास्क शिवाय प्रवेश नाही. अंतर राखा, गणपती किती तयार झाले हे पाहायला येवू नका, गणपतीचा साचा मागायला येवू नये अशा विविध प्रकारच्या सुचना या शाळांबाहेर आवर्जून लिहिण्यात आल्या आहेत. यातून नागरिकांना गर्दी न करण्यास आणि कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गणेशमूर्ती घडवताना मूर्तीकार देखील फिजीकल डिस्टन्सिंग ठेवून काम करताना पहायला मिळत आहेत. एकूणच काय तर गणेशमूर्ती चित्र शाळेत कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली खबरदारी घेवून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. रत्नागिरीतील अशाच एका मूर्ती शाळेतून या सर्वांचा टीव्ही 9 मराठीने आढावा घेतला. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या खबरदारीच्या सूचनां प्रकर्षाने पाहायला मिळाल्या.

हेही वाचा :

RIL AGM 2020 | Jio चा धमाका, पुढील वर्षी आत्मनिर्भर 5G, तर गुगलची 33 हजार कोटीची गुंतवणूक

निष्णात वकिलांची टीम 27 तारखेलाही असेल, मराठा आरक्षणाची सुनावणी समाधानी : अशोक चव्हाण

Ashok Gehlot | फाडफाड इंग्रजी आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, गहलोतांचा पायलटांना टोला

Kokan Ganeshotsav Special corona boards

Published On - 5:12 pm, Wed, 15 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI