Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन, 25 गावांच्या सरपंचांचा निर्णय

| Updated on: Jul 23, 2020 | 5:20 PM

खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.

Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन, 25 गावांच्या सरपंचांचा निर्णय
Follow us on

सिंधुदुर्ग : गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या (Konkan Ganeshotsav 2020) चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही. 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सिंधुदुर्गातील 25 गावांच्या सरपंचाची बैठक झाली (Konkan Ganeshotsav 2020).

खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन होणं अनिवार्य असेल. तरच बाजारात प्रवेश देण्यात येईल, असा एकमुखी निर्णय सरपंचाच्या या बैठकीत घेण्यात आला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने खुशखबर दिली आहे. नियमांचे पालन करुन चाकरमान्यांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली (Konkan Ganeshotsav 2020).

“एसटीची सेवा तर उपलब्ध होईल. त्यामुळे लोकांना एसटी उपलब्ध करुन द्याव्या लागतील. पण अटी शर्थींची पूर्तता करुन हे सर्व करावं लागेल. कोकणात गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती.

“मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत. राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे”, असंही अनिल परब यांनी सांगितलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावच्या सरपंचाची बैठक झाली. यामध्ये गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

Konkan Ganeshotsav 2020

संबंधित बातम्या :

Ganeshotsava | गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजरही बंद, पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिंता