आता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा

नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (Less than ten Permission to start a hotel Announced Aditya Thackeray)

आता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा
aaditya-Aditya
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 7:22 PM

मुंबई : इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक पार पडली. हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (Less than ten Permission to start a hotel Announced Aditya Thackeray)

या महत्त्वपूर्ण बैठकीला आदित्य ठाकरेंसह पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच छताखाली मिळतील यादृष्टीने वेबपोर्टल तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

बैठकीवेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह यांनी सादरीकरण केले. हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला कोणकोणत्या विभागाच्या परवानग्या लागतात, त्यातील कोणत्या आवश्यक नसलेल्या परवानग्यांची संख्या कमी करता येईल याबाबत माहिती दिली.

कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील. याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग विविध निर्णय घेत आहे. कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरणही तयार होत आहे. खासगी- सार्वजनिक सहभागातून काही प्रमुख पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात हॉटेल ताज गुंतवणूक करीत आहे.हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे, त्यामुळे राज्यात भविष्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल, रिसॉर्टस्, होम स्टे, फार्म स्टे आदी निर्माण होतील यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करीत आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी अर्ज, परवानग्यांची संख्या कमी करणे तसेच ही प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे असून यासाठी सर्व संबंधीत विभागांनी सहकार्य करावे, असंही आादित्य ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या-

…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

(Less than ten Permission to start a hotel Announced Aditya Thackeray)

Non Stop LIVE Update
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.