AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या निधनानंतर 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर, हिंमतीला दाद देत आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे लोकंही इमोशनल झाले असून त्यामध्ये अवघ्या 10 वर्षांच्या एका मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. वडिलांच्या पश्चात त्याने त्याच्या चिमुकल्या खांद्यावर घराची जबाबदारी घेतली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

वडिलांच्या निधनानंतर 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर, हिंमतीला दाद देत आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा
| Updated on: May 07, 2024 | 12:42 PM
Share

Anand Mahindra On Jaspreet Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. कधी महत्वाच्या घोषणा तर कधी एखादा इनोव्हेटिव्ह व्हिडीओ, कल्पना ते त्यांच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. आता त्यांनी आणखी एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला असून, त्यासोबत लिहीलेल्या कमेंटमुळे लोकांचं मन जिंकलंय. सोशल मीडियावर पुन्हा एकदा जबाबदारीबद्दलचा हा व्हिडीओ शेअर झाला असून ते पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तरंच नवल. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे लोकंही इमोशनल झाले असून त्यामध्ये अवघ्या 10 वर्षांच्या एका मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. वडिलांच्या पश्चात त्याने त्याच्या चिमुकल्या खांद्यावर घराची जबाबदारी घेतली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये ?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अवघ्या 10 वर्षांचा एक मुलगा रस्त्याच्या कडेला एक गाडी लावून रोल्स विकताना दिसतोय. बघता बघता हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आणि तो उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला. त्या मुलाची कहाणी ऐकून आनंद महिंद्रा हे स्वत: मदतीसाठी पुढे सरसावले. त्या मुलाच्या सांगण्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. त्याचा आणि बहिणीचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो मुलगा स्वत: मेहनत करतो आणि रोल्सची ही गाडी चालवतो. या मुलाचा हा व्हिडीओ आधीही व्हायरल झाला होता.

2 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्या मुलाने सांगितले की, पूर्वी त्याचे वडील रोल विकायचे, पण त्याच्या मृत्यूनंतर आता तो हे काम करतो. आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली आहे. त्याची आी आता त्यांच्यासोबत रहात नाही, ती माहेरी निघून गेल्याचेही त्या मुलाने सांगितलं. तो आणि बहीण त्याच्या काकांसोबत राहतात आणि तो रोल्स विकून पैस कमावतो. मात्र असं असंल तरी त्याने त्याचं शिक्षण अद्यापही सोडलं नसून, काम करता करता तो शिक्षणही पूर्ण करतोय. एवढ्या लहान वयात एवढी मेहनत करण्याची हिम्मत कुठून आली? असा सवाल त्याला एकाने विचारला. त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘मी गुरु गोविंद सिंह यांचा मुलगा आहे. माझ्यात ताकद आहे तोपर्यंत मी लढेन, असे सांगत त्या मुलाने शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत केली घोषणा

एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी या मुलाची माहिती देखील मागितली आहे. ‘हिमतीचे दुसरं नाव म्हणजे जसप्रीत..’ पण त्याच्या शिक्षणावर परिणाम झाला नाही पाहिजे. जर कोणाकडे याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर प्लीज शेअर करा. शिक्षणासाठी त्याला सपोर्ट कसा करता येईल याचा उपाय महिंद्रा फाऊंडेशनची टीम शोधून काढेल, असे सांगत त्यांनी त्या चिमुकल्या मुलाला मदत करण्याची घोषणा केली. त्यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स आल्या असून अनेकांनी त्या मुलाच्या हिमतीला दाद देत त्याचं कौतुक केलं.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ