AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH : मुंबईकडून पदार्पण, 4 ओव्हरमध्ये 42 धावा देऊनही अंशुल कंबोजच का होतय कौतुक? त्याने असं काय केलं?

MI vs SRH : इरफान पठाण सातत्याने हार्दिक पांड्याला लक्ष्य करत असतो. पण यावेळी इरफान पठाणने मुंबईकडून डेब्यु करणाऱ्या अंशुल कंबोजच खास कौतुक केलय. अंशुलने मैदानावर असं काय केलं? ज्याने इरफान पठाण सारख्या ऑलराऊंडरला प्रभावित केलं.

MI vs SRH : मुंबईकडून पदार्पण, 4 ओव्हरमध्ये 42 धावा देऊनही अंशुल कंबोजच का होतय कौतुक? त्याने असं काय केलं?
Anshul kamboj debut match from mumbai indians
| Updated on: May 07, 2024 | 9:12 AM
Share

मुंबई इंडियन्सकडून अंशुल कंबोज या गोलंदाजाने IPL 2024 मध्ये डेब्यु केला. आपल्या पहिल्याच सामन्यात अंशुलने 4 ओव्हरमध्ये 42 धावा दिल्या. पण, तरीही त्याचं कौतुक होतय. तुम्हाला असा प्रश्न पडेल की, प्रतिओव्हर 10 रन्स देऊनही या गोलंदाजाच इतकं कौतुक का होतय?. त्याचं कारण आहे, अंशुलची गोलंदाजी. क्रिकेटमध्ये आकड्याला खूप महत्त्व आहे. पण काहीवेळा आकडे हे गोलंदाजाच्या प्रतिभेला न्याय देत नाहीत. असच काहीस अंशुल कंबोज सोबत झालं. अंशुल कंबोज हैदराबाद विरुद्ध महागडा ठरला. पण हे सुद्धा तितकच खरं आहे, या खेळाडूला नशिबाची साथ मिळाली नाही.

अंशुलकडून हार्दिक पांड्याने गोलंदाजीची ओपनिंग केली. त्याने दुसरी ओव्हर टाकली. त्याच्या गोलंदाजीवर ट्रेविस हेड दोनदा बोल्डा होता, होता बचावला. त्यानंतर अंशुलने पुढच्याच ओव्हरमध्ये हेडला बोल्ड केलं. पण तो नो बॉल होता. मोठी गोष्ट म्हणजे अंशुल कंबोजने पुन्हा एकदा हेडला आऊट केलंच होतं. त्याच्या गोलंदाजीवर तुषाराच्या हातात थेट कॅच गेली. पण या खेळाडूने सोपी संधी गमावली.

इरफान पठाण सुद्धा या गोलंदाजावर प्रभावित

अंशुल कंबोजने हार मानली नाही. त्याने डेब्युमध्ये पहिली विकेट घेतलीच. मयंक अग्रवाल अंशुल कंबोजचा पहिला विकेट ठरला. त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मयंक बोल्ड झाला. अंशुल कंबोज आपली पहिली विकेट घेतल्यानंतर खूप आनंदात होता. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीच इरफान पठाणने सुद्धा कौतुक केलं. “कंबोजने जवळपास दोनवेळा हेडला आऊट केलच होतं. त्याच्या गोलंदाजीत दम आहे” असं इरफानने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.