AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर

कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. (MNS Amey Khopkar Warns After Ashalata Wabgaonkar died due to corona)

...तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर
| Updated on: Sep 22, 2020 | 6:08 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता मालिकांच्या शुटिंगच्या सेटवर शुटींग करत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके स्थापन करणार असल्याचं सांगत सर्व निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा देत परिपत्रक काढले आहे. तसंच मनसेने देखील प्रोटोकॉलचे पालन करण्याबाबत हलगर्जीपणा करू नये, असा इशारा दिला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तसंच मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हे परिपत्रक काढले आहेत. (MNS Amey Khopkar Warns After Ashalata Wabgaonkar died due to corona)

लॉकडाऊनच्या काळात कलाकार मंडळी, तंत्रज्ञ कामगार यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच शासनाने नियम अटी घालून शुटींगसाठी परवानगी दिली होती. मात्र अनेक शुटिंग्जच्या ठिकाणी तसंच काही निर्मात्यांकडून नियमांचं पालन होताना दिसत नाही, यासाठी निर्वाणीचा इशारा म्हणून हे परिपत्रक काढलं गेलं आहे, असं मेघराज राजेभोसले आणि अमेय खोपकर यांनी सांगितलंय.

कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सेटवरील लहान मुले तसंच ज्येष्ठ कलावंतांची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यांच्या बाबतीत हयगय झाली तर न्यायालय देखील पुनर्विचार करेल, असं परिपत्रकात म्हटलंय.

शुटिंगबरोबरच चित्रपटगृहे, नाट्यगृहे व कलावंतांचे असणारे इतर सर्व प्लॅटफॉर्म सरकारने सुरू करावेत, यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ प्रयत्नशील आहे. मात्र आपल्याच अनास्थेमुळे हा प्रयत्नांना खीळ बसत असल्याची खंत देखील मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली आहे. तसंच पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला तर आपल्याच क्षेत्रातील कलावंत तंत्रज्ञांचे हाल होतील त्यामुळे सगळ्यांनी आताच खबरदारी घ्यावी, अशी विनंती देखील मेघराज राजेभोसले यांनी केली आहे.

चित्रपट मालिका वेब मालिका अल्बमजहिरात, अल्बम, डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचे शूटिंग करायचे झाल्यास सर्वप्रथम कलेक्टर व पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे. परवानगीशिवाय कुणीही शूटिंग करू नये, असं स्पष्ट अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सांगितलं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे चित्रपट महामंडळासह मनसेने आक्रमक पवित्रा घेत नियमांचं पालन करण्याबाबत कडक सूचना केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

(MNS Amey Khopkar Warns After Ashalata Wabgaonkar died due to corona)

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.