AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आज मुंबईत, राफेलपासून क्षेपणास्त्रांपर्यंत…कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर असून, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक करार होणार आहेत. या भेटीचे संपूर्ण वेळापत्रक, महत्त्वाचे करार आणि मुंबईतील वाहतूक निर्बंधांची सविस्तर माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आज मुंबईत, राफेलपासून क्षेपणास्त्रांपर्यंत...कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?
PM Narendra Modi and President Macron Mumbai Visit
| Updated on: Feb 17, 2026 | 8:26 AM
Share

भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक आणि राजनैतिक संबंध अधिक बळकट करण्याचा एक नवा सुवर्ण अध्याय आज मुंबईत लिहिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या ऐतिहासिक भेटीसाठी मुंबई सज्ज झाली आहे. यावेळी संरक्षण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांत महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आज मुंबईत एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आज सकाळी त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी २:१५ वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते लोकभवन येथे द्विपक्षीय चर्चेसाठी एकत्र येतील. या भेटीत केवळ संरक्षण करारच नव्हे, तर ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत अत्याधुनिक जेट इंजिन तंत्रज्ञान, राफेल मरीन आवृत्ती आणि हॅमर क्षेपणास्त्रांच्या निर्मितीबाबत ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

महत्त्वाच्या कार्यक्रमांची रूपरेषा

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे सकाळी मुंबईत आगमन झाले, जिथे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी दुपारी २:१५ वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतरचे कार्यक्रम कसे असतील याची माहिती समोर आली आहे.

द्विपक्षीय बैठक (दुपारी ३.१५): ‘लोकभवन’ (पूर्वीचे राजभवन) येथे दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होईल. यात प्रामुख्याने हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि धोरणात्मक प्रगतीचा आढावा घेतला जाईल.

सीईओ गोलमेज परिषद (सायंकाळी ५.१५): हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे जागतिक स्तरावरील बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दोन्ही नेते संवाद साधतील. यात नवीन गुंतवणूक आणि मेक इन इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर दिला जाईल.

सांस्कृतिक उद्घाटन (सायंकाळी ६.३०): गेटवे ऑफ इंडिया येथे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६’ चे अधिकृत उद्घाटन होईल. यावेळी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे महत्त्वाचे करार अपेक्षित

१. हॅमर क्षेपणास्त्र निर्मिती: भारतात या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी करार होण्याची शक्यता २. राफेल मरीन: भारतीय नौदलासाठी राफेलच्या सागरी आवृत्तीच्या किंमतीबाबत अंतिम चर्चा ३. एअरबस H125 हेलिकॉप्टर: टाटा-एअरबस यांच्या संयुक्त प्रकल्पातील अंतिम असेंब्ली लाईनचे व्हर्च्युअल उद्घाटन ४. संरक्षण तंत्रज्ञान: जेट इंजिन आणि पाणबुडी सहकार्याबाबत नवीन सामंजस्य करार ५. आरोग्य सेवा: एआय (AI) आधारित आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्यावर भर

वाहतुकीत मोठे बदल आणि निर्बंध

मुंबईतील व्हीव्हीआयपींच्या हालचालींमुळे दक्षिण मुंबईत दुपारी २:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि शामा प्रसाद मुखर्जी चौक सर्व वाहनांसाठी बंद असेल. पी. रामचंदानी मार्ग नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंत पूर्णपणे बंद राहील. या पार्श्वभूमीवर रिगल जंक्शनकडे जाणारी वाहने शहीद भगतसिंग रोड आणि महाकवी भूषण रोडमार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाकोला ते दहिसर टोल नाक्यापर्यंत सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Follow Us
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं