AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok sabha Elections 2024: वंचितच्या उमेदवाराच्या गाडीवर रात्री हल्ला, गाडीचे नुकसान, उमेदवार बचावल्या

शिर्डी लोकसभेतील वांचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत येत होत्या. रात्री 10 वाजता प्रचार सभा आटोपून त्या अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला.

Lok sabha Elections 2024: वंचितच्या उमेदवाराच्या गाडीवर रात्री हल्ला, गाडीचे नुकसान, उमेदवार बचावल्या
वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यावर हल्ला झाला.
| Updated on: May 07, 2024 | 9:45 AM
Share

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु झाले आहे. मात्र, त्याआधीच मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला झाला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ ही घटना घडली आहे. हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्षा रूपवते यांना काही झाले नाही, परंतु त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चितळवेढे गावाजवळ हल्ला

शिर्डी लोकसभेतील वांचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत येत होत्या. रात्री 10 वाजता प्रचार सभा आटोपून त्या अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. हल्ला करणारे दोन जण असल्याचे सांगितले जात आहे. या दगडफेकीत गाडीच नुकसान झाले. सुदैवाने रुपवते यांना काहीच झाले नाही.

घटनास्थळी वंचितचे कार्यकर्ते दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्याचवेळी वंचित आघाडीचे कार्यकर्ते आले. या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्षा रुपवते यांनी शांत केले.

अन्यथा डोळ्यात गेली असती काच

हल्ल्यासंदर्भात बोलताना उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, मी प्रचार पूर्ण करुन येत होते. गाडीत फोनवर बोलत असताना काही तरी आपटल्याचा आवाज आला. त्यावेळी पावडर तोडांत गेली. गाडीच्या काही काचाही उडल्या. सुदैवाने या काचा डोळ्यात गेल्या नाही. सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते मी सुखरुप आहे. कार्यकर्त्यांनी आपला प्रचार सुरु ठेवावा. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.