LIVE : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भेटण्यापूर्वी विनोद तावडे राजभवनावर दाखल

| Updated on: Nov 05, 2019 | 6:56 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भेटण्यापूर्वी विनोद तावडे राजभवनावर दाखल
Follow us on

[svt-event title=”काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजभवनावर दाखल” date=”05/11/2019,5:46PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेससह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजभवनावर दाखल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, धीरज देशमुख, अमित देशमुख राजभवनावर दाखल, तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड राजभवनात दाखल, थोड्याच वेळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करणार आहेत [/svt-event]

[svt-event title=”भाजप नेते विनोद तावडे राजभवनावर दाखल” date=”05/11/2019,5:40PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते राज्यपालाला भेटण्यापूर्वीच  विनोद तावडे राजभवनावर दाखल, विनोद तावडे राज्यपालांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक दाखल राजभवनवर दाखल” date=”05/11/2019,5:39PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक दाखल राजभवनवर दाखल [/svt-event]

[svt-event title=”पुणेकर पाणी जपून वापरा, संपूर्ण शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद” date=”05/11/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] पुणे : शहरातील पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (7 नोव्हेंबर) विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (8 नोव्हेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर भेट देणार ” date=”05/11/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] बीड : उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर भेट देणार, ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर जाणार, गोपीनाथ गड गोपीनाथ मुंढे यांचे स्मृतीस्थळ, सेना भाजप युतीतील महत्वाचा दुवा गोपीनाथ मुंडे होते [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात दुष्काळ पाहणी दौरा” date=”05/11/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] बीड : उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, मराठवाड्यातील चार जिल्ह्यात आणि सहा तालुक्यात पाहणी, सकाळी 11 वाजता लोह पाहणी दौऱ्याला सुरुवात, लोह, कंधार, अहमदपूर, गंगाखेड, माजलगाव, गेवराई या तालुक्यांना देणार भेटी [/svt-event]

[svt-event title=”महाविद्यालयीन तरुणीकडून कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान” date=”05/11/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : राजकीय धामधुमीत एक चांगली बातमी, औरंगाबादच्या महाविद्यालयीन तरुणीकडून कॅन्सरग्रस्तांसाठी आपले झुपकेदार केस दान, किरण गीते असं तरुणीचं नाव, किरणच्या प्रेरणादायी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक [/svt-event]

[svt-event title=” तरुण भारत माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’” date=”05/11/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : तरुण भारत विरुद्ध सामनातला सामना, तरुण भारत माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’, तरुण भारत वृत्तपत्रातून संजय राऊतांना टोला, तरुण भारतच्या अग्रलेखावरुन संजय राऊत अस्वस्थ झाल्याचीही टीका, सेनेला 175 आमदारांच्या पाठिंब्याचीही तरुण भारतने खिल्ली उडवली, संजय राऊत यांना वृत्तपत्राच्या संपादक पदाच्या जबाबदारीचीही आठवण करुन दिली [/svt-event]

[svt-event title=”अयोध्या निकालासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘दक्ष’” date=”05/11/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशात तणाव निर्माण होऊ नये म्हणून संघाची पावलं उचलायला सुरुवात, देशभरात शांतता राहावी म्हणून संघाचं नियोजन, स्वयंसेवकांनाही पूर्वकल्पना, संघाच्या सर्व संघटनांच्या बैठका घेवून स्वयंसेवकांना सुचना, प्रमुख महानगरांमध्ये संघातील स्वयंसेवकांच्या बैठका [/svt-event]