परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संजयची पत्नी मान्यता दत्तने प्रतिक्रिया दिली आहे (Maanayata Dutt statement on husband Sanjay Dutt health).

परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 3:54 PM

मुंबई : अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती काल (11 ऑगस्ट) रात्री उशिरा समोर आली. मात्र, याबाबत संजय दत्त आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, आज संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने याबाबत आपली प्रतिक्रिया जारी केली आहे (Maanayata Dutt statement on husband Sanjay Dutt health).

“मी सर्व हितचिंतकांप्रती आभार व्यक्त करते, ज्यांनी संजयच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रचंड शक्ती आणि आशीर्वादाची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आमचं कुटुंब अनेक संकटांमधून गेलं. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे”, असं मान्यता दत्त म्हणाली.

हेही वाचा : संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

“संजू नेहमी लढवय्या राहीला आणि आमचं कुटुंबही. परमेश्वर पुन्हा आमची परीक्षा घेतोय. परमेश्वराला बघायचंय की, आम्ही कसं या संकटाचा सामना करतो. आम्हाला फक्त तुमची प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही जिंकू, जसं आम्ही नेहमीप्रमाणे जिंकत आलो आहोत, अगदी तसंच जिंकू. चला, या संधीला प्रकाशमान करु आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी वापर करु”, असं मान्यता म्हणाली (Maanayata Dutt statement on husband Sanjay Dutt health).

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला रविवारी (8 ऑगस्ट) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात (10 ऑगस्ट) संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात दाखल असतानाही संजय दत्तने ट्वीट करत त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती.

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट संजय दत्तने रुग्णालयात दाखल असताना (8 ऑगस्ट) केले होते.

दरम्यान, संजय दत्तने मंगळवारी (11 ऑगस्ट) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मित्रांनो काही वैद्यकीय उपचारांसाठी मी नेहमीच्या कामातून ब्रेक घेत आहे. माझ्यासोबत माझे कुटुंबिय आणि मित्र परिवार आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमच्या प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन”, असे या पोस्टमध्ये संजय दत्तने म्हटलं होते (Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer).

उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

कर्करोगाच्या उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत त्याच्यावर उपचार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळेच पुढचे काही दिवस संजय दत्त शूटिंग आणि सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.

दरम्यान, याबाबत संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उद्या अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.

संजय दत्तची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं सध्या दुबईत आहेत. संजय दत्तच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारासाठी संजयला तातडीने अमेरिकेला जावं लागेल.

संजय दत्तचा ‘पानिपत’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तो ‘सडक 2’, ‘शमशेरा’, ‘भुज’, ‘केजीएफ’, ‘पृथ्वीराज आणि तोरबाज’ अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे काही चित्रपटांच्या शूटिंगला ब्रेक लागला होता.

संजय दत्तच्या ‘सडक 2’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी (11 ऑगस्ट) प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याचं प्रदर्शन मंगळवारी टाळण्यात आलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.