परळीत माफियाराज, पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; मी थकलेली नाही, लढाई सुरू म्हणत थेट इशारा!

| Updated on: Nov 14, 2021 | 6:19 PM

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत यंदाही वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. त्याचे वातावरण आतापासून तापायला सुरुवात झाली आहे.

परळीत माफियाराज, पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; मी थकलेली नाही, लढाई सुरू म्हणत थेट इशारा!
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
Follow us on

परळीः परळीमध्ये माफियाराज सुरू आहे, असा घणाघाती हल्ला धनंजय मुंडे यांच्यावर चढवत रविवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले. येत्या काळात ही वर्चस्वाची लढाई आणखी तीव्र होणार आहे.

सध्या राज्यभरातील अनेक महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका आगामी काही महिन्यांमध्ये होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर परळी नगरपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पंकजा यांच्या वतीने रविवारी दिवाळी स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी आक्रमक होत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

त्या पातळीवर जाणार नाही…

आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीत माफियाराज सुरू आहे. धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी मला त्या पातळीला जावे लागेल. मात्र, ते मला कधीच जमणार नाही. तुमचा नेता थकलेला नाही. कामाला लागा. लढाई आता सुरू झाली आहे, असे म्हणत त्यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. आगामी काळातील निवडणूक लक्षात घेता ही आरोप-प्रत्यारोपांची लड अजून वाढतच जाईल, यात शंका नाही.

काय झाले गेल्या निवडणुकीत?

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणींमध्ये रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पंकजा यांना धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड आणखी मजबूत करत 33 पैकी 27 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपच्या पदरात अवघ्या 4 जागा पडल्या होत्या. त्यानंतर परळीच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. पंकजा यांनी ‘मी हा पराभव स्वीकारत आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती.

यंदाही वर्चस्वाची लढाई

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत यंदाही वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. त्याचे वातावरण आतापासून तापायला सुरुवात झाली आहे. आता पंकजांनी केलेल्या आरोपाला धनंजय मुंडेही नक्की उत्तर देतीलच. राज्यातील ज्या काही महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुका आहेत. त्यापैकी परळी-वैजनाथमधील ही लढत नक्कीच रोमहर्षक होणार, यात शंका नाही. याची सुरुवात पंकजांनी केली आहे. शेवट कोणाच्या विजयाने होतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

परळीत माफियाराज सुरू आहे. धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी मला त्या पातळीला जावे लागेल. मात्र, ते मला कधीच जमणार नाही. तुमचा नेता थकलेला नाही. कामाला लागा. लढाई आता सुरू झाली आहे.

-पंकजा मुंडे, भाजप नेत्या

इतर बातम्याः

अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली नाही, शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य, शरद पवारांचे प्रतिपादन

महसूल मंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना 8 सूचना; ज्याने गाव आणि शेतीचा चेहरा-मोहरा बदलेल!