Maharashtra Board Syllabus | पहिली ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

| Updated on: Jul 25, 2020 | 5:00 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला (Maharashtra Board syllabus reduced by 25 percent) आहे.

Maharashtra Board Syllabus | पहिली ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकतंच याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. (Maharashtra Board syllabus reduced by 25 percent)

“कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली,” असे ट्विट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

“राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सन 2020-21 शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरु झालं आहे. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण सुरु असलं पाहिजे, या अंतर्गत विविध माध्यमातून शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. पण अजूनही प्रत्यक्ष शाळा सुरु झालेल्या नाही. अशा परिस्थिती मुलांच्या मनात तणाव राहू नये. विद्यार्थ्यांना दडपण येऊ नये. या दृष्टीकोनातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यामाने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्ष इयत्ता 1 ली ते १२ वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,” असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शासन निर्णयात नेमकं काय? 

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोव्हिड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यास शासन मान्यता देत आहे. सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Board syllabus reduced by 25 percent)

संबंधित बातम्या : 

E-School Reopens | ना शाळेची घंटा, ना सवंगड्यांची भेट, वर्च्युअल शाळा उघडल्या, ई-शिक्षणाचा श्रीगणेशा

Uddhav Thackeray | परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे