बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ दरम्यान मृत्यू झालेल्या ‘त्या’ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, राज्यात कोरोना बळींची संख्या 8 वर

बुलडाण्यात क्वारंटाईनदरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Maharashtra Corona Patient Died) आहे.

बुलडाण्यात क्वारंटाईन दरम्यान मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, राज्यात कोरोना बळींची संख्या 8 वर
| Updated on: Mar 29, 2020 | 6:49 PM

बुलडाणा : महाराष्ट्रात कोरोनाने आठवा बळी घेतला (Maharashtra Corona Patient Died) आहे. काल (28 मार्च) बुलडाण्यात क्वारंटाईनदरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर आज ( 29 मार्च) मुंबईत एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या आठवर पोहोचली आहे.

बुलडाण्यात 26 मार्चला खाजगी रुग्णालयात न्यूमोनिया (Maharashtra Corona Patient Died) झाल्याने एक 45 वर्षीय रुग्ण दाखल झाला होता. त्या रुग्णाचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याला 28 मार्चला सामान्य रुग्णालयातील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. यावेळी तो व्यक्ती क्वारंटाईन असल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे का याची माहिती समोर आली नव्हती.

तसेच कोरोना त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण आहे की नाही हे ही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं नव्हतं. आज (29 मार्च) बुलडाण्यातील तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे हा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

तर मुंबईच्या एका महापालिका रुग्णालयात या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, महिलेचा काल (28 मार्च) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर आज रिपोर्टमध्ये त्यांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालं आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च

मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)

  • मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
  • मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
  • मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
  • मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू (1)– 26 मार्च
  • बुलडाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च
  • मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

Maharashtra Corona Patient Died