चिअर्स! पर्यटनस्थळं, महामार्गालगतची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Dec 04, 2020 | 7:00 PM

सर्वोच्च न्यायालयाने 2016 साली लागू केलेल्या अंतर निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल 2200 मद्याची दुकाने बंद झाली होती. | Alcohol and wine shops

चिअर्स! पर्यटनस्थळं, महामार्गालगतची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय
Follow us on

मुंबई: कोरोना संकटामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 2016 पासून विविध निर्बंधांमुळे बंद असलेली मद्याची दुकाने (Wine shops) पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत: पर्यटन स्थळे आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गांलगत असणाऱ्या मद्याच्या दुकानांचा समावेश आहे. (Maharashtra government lifts ban on Alcohol and wine shops in state)

सर्वोच्च न्यायालयाने 2016 साली लागू केलेल्या अंतर निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल 2200 मद्याची दुकाने बंद झाली होती. नंतरच्या काळात न्यायालयाने यासंदर्भातील नियम काहीसे शिथील केले. त्यामुळे यापैकी काही दुकाने सुरु झाली होती. मात्र, आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे उर्वरित 2200 पैकी 1500 दुकाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आले.

दरम्यान, आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोणता नवा वाद निर्माण होणार का, पाहावे लागेल. यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात मद्याची दुकाने आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली होती. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्यामुळे आतादेखील भाजप सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेणार का, हे पाहावे लागेल.

कोणत्या भागातील मद्याची दुकाने सुरु होणार?

– या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद असलेली दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी
– महापालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने
– तर नगरपालिका हद्दीपासून 3 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने
– दीड हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील मद्याची दुकानेही आता सुरु होतील.

संबंधित बातम्या:

लोणावळ्यातील दुकाने रात्री 9 पर्यंत राहणार खुली, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस

Karnataka Liquor : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री

(Maharashtra government lifts ban on Alcohol and wine shops in state)