Karnataka Liquor : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री

कर्नाटकात तर तळीरामांनी दारु खरेदीचा नवा विक्रम केल्याचं चित्र आहे. कर्नाटकात आज एका दिवसात दारुची विक्रमी विक्री झाली आहे.

Karnataka Liquor : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 9:41 PM

बंगळुरु : लॉकडाऊनमुळे बंद असलेली दारुची दुकानं (Karnataka Liquor Sale ) आज तब्बल दीड महिन्यांनी उघडली. त्यामुळे तळीरामांमध्ये भलताच उत्साह आज पाहायला मिळाला. सकाळपासूनच दारुच्या दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. कर्नाटकात तर तळीरामांनी दारु खरेदीचा नवा विक्रम केल्याचं चित्र आहे. कर्नाटकात आज एका दिवसात दारुची विक्रमी विक्री झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 45 कोटींची मद्यविक्री कर्नाटकात झाली, अशी माहिती उत्पादन शुल्क (Karnataka Liquor Sale ) विभागाने दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशात लॉकडाऊन आहे. आजपासून या लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. त्यासोबतच सरकारने आजपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व झोनमधील दारु दुकानं उघडण्यास सशर्त परवागनी देण्यात आली. त्यामुळे आज देशातील दारु दुकानं उघडण्याच्या आधीच दुकानांबाहेर लोकांच्या रांगा दिसून आल्या.

कर्नाटकातही दारुची दुकानं उघडण्यापूर्वी तळीरामांनी दुकानांबाहेर नंबर लावून ठेवल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी फटाके फोडून दुकाने उघडण्यात आली, तर काहींनी पहिल्या ग्राहकाच्या गळ्यात हार घालून त्याचं (Karnataka Liquor Sale ) स्वागत केलं. तब्बल दीड महिन्यांनी दारुची दुकानं उघडल्याने कर्नाटकात तळीरामांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे एका दिवसात 45 कोटी रुपयांची दारु विक्री झाली. यामध्ये 3.9 लाख लिटर बिअरची विक्री झाली आहे, तर 8.5 लाख लिटर देशी दारुची विक्री झाली आहे. फक्त 10 तासात 45 कोटी रुपयांची दारु विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली.

आजपासून कुठे काय सुरु राहणार?

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी नवी नियमावली जारी केली. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले.

– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.

– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.

या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोन आणि रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता दारुची दुकानं उघडी ठेवता येणार आहेत.

Karnataka Liquor Sale

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश

बेळगावात ‘ग्राहक देवो भव:’, दारुच्या दुकानात हार घालून पहिल्या ग्राहकाचं स्वागत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.