Rain Updates: रत्नागिरी-गडचिरोलीला पावसानं झोडपलं, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल

| Updated on: Aug 16, 2020 | 10:35 AM

राज्यात पावासाचा जोर काहीसा कमी होत असला तरी कोकणात मुसळधार पाऊस पडतो आहे (Maharashtra Rain Updates Flood).

Rain Updates: रत्नागिरी-गडचिरोलीला पावसानं झोडपलं, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल
Follow us on

मुंबई : राज्यात पावासाचा जोर काहीसा कमी होत असला तरी कोकणात मुसळधार पाऊस पडतो आहे (Maharashtra Rain Updates Flood). रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसाने वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे थेट चिपळूनमध्ये पाणी शिरलं आहे. दुसरीकडे गडचिरोलीतही दमदार पाऊस झालाय. भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने घरात पाणी घूसून मध्यरात्रीपासून नागरिकांचे होल होत आहेत.

LIVE Updates:

  • कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार, धरणक्षेत्रातही दमदार पाऊस, कोल्हापूर जिल्ह्यातील 46 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणीपातळी 32 फूट 8 फुटांवर, पंचगंगा पुन्हा एकदा पात्राबाहेर, राधानगरी धरणाचे 3 दरवाजे पुन्हा उघडले, 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे

खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. आता धरणातून मुठा नदीत 9,350 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 13 क्यूसेकने विसर्ग घटला. त्यामुळे मुठा नदीच्या पात्राची पाणीपातळी काहीशी कमी झालीय. खडकवासला धरणात सध्या 1.86 टीएमसी म्हणजेच 94.08 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पानशेत 9.82 टीएमसी म्हणजेच 92.19 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वरसगाव धरणात 9.96 टीएमसी म्हणजेच 77.78 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर धरणात 2.33 टीएमसी म्हणजेच 62.75 टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये आतापर्यंत 23. 97 टीएमसी म्हणजेच 82.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या 29.97 टीएमसी (100 टक्के) तुलनेत सध्या पाणीसाठा कमी आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. वाशिष्ठी नदीचे पाणी थेट चिपळूण शहरात शिरलंय. चिपळूणच्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झालंय. चिंचनाका परिसरात तर 3 फूट पाणी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ही स्थिती तयार झाली आहे.

खबरदारी म्हणून शनिवारी (15 ऑगस्ट) रात्रीपासून पुलावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. जुना एसटी स्टँड, बाजारपेठ, मच्छिमार्केट, भाजी मार्केट ,चिंचनाका, जुना बाजार पूल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तर एसटी वाहतूक शिवाजीनगर येथील बस स्थानकातून सुरु आहे.

गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर येऊन शहरात पुराचं पाणी शिरलं. पुराचं पाणी शहरात मुख्य चौकापर्यंत आलं आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून प्रशासन आणि नागरिकांची धावपळ झाल. अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

सांगली

सांगलीत कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 23 फुटांवर पोहचली. वारणा धरण 90.14 टक्के भरलंय. धरणातून विसर्ग वाढला आहे. वारणा धरणातून 13 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झालीय.

हेही वाचा :

Pune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले

Rain Update: मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाणी विसर्ग

पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं

संबंधित व्हिडीओ :


Maharashtra Rain Updates Flood