धक्कादायक, माता-बालक पोषण आहारात चक्क साप सापडला

संबधित अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून हा आहार परत घेतला

धक्कादायक, माता-बालक पोषण आहारात चक्क साप सापडला
Rajmata Jijau Mother-Child Health and Nutrition Mission
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 02, 2024 | 9:55 PM

महाराष्ट्र शासनाच्यावतीने गेली अनेक वर्षे एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत गर्भवती माता आणि 6 महिने ते 3 वर्षे वयाच्या बालकांना पोषण आहार दिला असतो. या पोषण आहारात अनेकदा अळ्या आणि इतक घटक सापडल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. परंतू आता माता-बालक पोषण आहारात चक्क साप सापडला आहे. त्यामुळे पोषण आहार मिळणाऱ्या माता आणि अंगणवाडी सेविकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोषक आहार अनेक वर्षे पुरविला जात असतो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ तूरडाळ गहू तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून पाकिटात डाळ, तिखट, मीठ एकत्र करून आणि गव्हाचे पीठ, साखर असा एकत्रित करून मिळतो. या पोषण आहाराचे कंत्राट नवीन कंपनीस दिले आहे. नुकताच एप्रिल आणि मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील बिटला पोहोचला. काही लाभार्थ्यांनी हा आहार घरी नेल्यावर कृषीनगर अंगणवाडी क्रमांक 116 मधून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला आणि पाकिट फोडले असता त्यांना धक्काच बसला. त्या पिशवीत सापाचे मृत झालेले पिल्लू होते. त्यांनी तत्काळ संबधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला आणि तक्रार केली.

अंगणवाडी सेविकांची भूमिका

संबधित अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून हा आहार परत घेतला. पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी बैठक घेवून हा पोषणा आहार न वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

शालेय पोषण आहार पूर्वीप्रमाणे द्या

महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. पोषण आहारात याआधी हरभरा, तांदूळ, तूरडाळ, गहू, तिखट- मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्या पासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून दिले जाते.