VIDEO : नांदेडमध्ये दिव्यांग मुलाची कमाल, ऑटोपासून कारची निर्मिती

| Updated on: Mar 09, 2020 | 8:18 PM

दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका दिव्यांगाने चक्क ऑटोपासून जिप्सीसारखी जीप (Making new jeep by Handicap boy) तयार केली आहे.

VIDEO : नांदेडमध्ये दिव्यांग मुलाची कमाल, ऑटोपासून कारची निर्मिती
Follow us on

नांदेड : दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका दिव्यांगाने चक्क ऑटोपासून जिप्सीसारखी जीप (Making new jeep by Handicap boy) तयार केली आहे. नांदेडमधील नायगाव तालुक्यातील नरसी गावातील जमीर खानने कल्पकता वापरत ही जीप तयार केली. त्याने चक्क ऑटोच्या इंजिनापासून जिप्सीसारखी गाडी (Making new jeep by Handicap boy) बनवली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील नरसी इथे हा जमीर खान राहतो. जन्मतः दोन्ही पायांनी अपंग असलेल्या जमीरने आपल्या अपंगात्वर मात केली आहे. जमीर खान हा स्वतः ऑटोचा मेकॅनिक आहे. त्यातून त्याला वेगवेगळे प्रयोग करण्याचा छंद आहे. स्वतःला दोन्ही पाय नसल्याने त्याला फिरायला इतरांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यातून त्याच्या डोक्यात ही आगळी-वेगळी कल्पना आली आणि त्याने थेट ऑटोपासून जीप तयार केली.

जमीरने आपलं भन्नाट डोके वापरत एका ऑटोच्या इंजिनपासून जिप्सीसारखी दिसणारी जीप बनवली. ही अनोखी चार चाकी बनवण्यासाठी जमीरने दीड लाख रुपये खर्च केले आहेत. त्याच्या या अनोख्या जिप्सीची सध्या सर्वत्र चर्चा असून सर्वच जण त्याचे कौतुक करत आहेत. ही जिप्सी घेऊन जमीर आता जिल्ह्यात कुठेही फिरु शकत आहे. आज त्याने नांदेडला येऊन आपला हा शोध जिल्हाधिकाऱ्यांना दाखवला. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी या अनोख्या जिप्सीची पाहणी करत जमीरचे कौतुक केलं.

या जिप्सी गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला दोन्ही पाय नाहीत असा व्यक्ती ही गाडी चालवू शकते. स्वतःच्या वापरासाठी ही जीप बनवताना जमीरने या गाडीत क्लच, ब्रेक आणि गिअर हे हाथाने टाकता येतील, अशी सोय केलेली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीसाठी ही कार उपयोगी ठरणार आहे. जमीर खानला ऑटोपासून जीप बनवताना सहकारी मेकॅनिक मंडळींची मोठी मदत झाल्याचे तो सांगतोय. इच्छा असेल तर मार्ग दिसतो असे म्हणतात. त्यातूनच मेकॅनिक जमीर आता रुबाबात चारचाकीत फिरत आहे.