AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मणिकर्णिका’ची पहिल्या दिवसाची कमाई 8.75 कोटी, ‘ठाकरे’ची किती?

Manikarnika मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका (Manikarnika) या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगला गल्ला जमवला आहे. ठाकरे (Thackeray) आणि मणिकर्णिका हे दोन्ही सिनेमे शुक्रवारी 25 जानेवारीला रिलीज झाले. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मणिकर्णिका या सिनेमात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला करणी सेनेने आक्षेप घेतला होता. […]

'मणिकर्णिका'ची पहिल्या दिवसाची कमाई 8.75 कोटी, 'ठाकरे'ची किती?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

Manikarnika मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका (Manikarnika) या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगला गल्ला जमवला आहे. ठाकरे (Thackeray) आणि मणिकर्णिका हे दोन्ही सिनेमे शुक्रवारी 25 जानेवारीला रिलीज झाले. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मणिकर्णिका या सिनेमात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला करणी सेनेने आक्षेप घेतला होता. मात्र त्याला न घाबरता कंगनाने जशास तसं उत्तर दिलं.

जवळपास 125 कोटी रुपये बजेट असलेल्या कंगनाच्या मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमाने पहिल्या दिवशी 8 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मणिकर्णिकाने पहिल्या दिवशी जरी पावणे कोटी रुपयांचा गल्ला जमवला असला, तरी आज शनिवारी आणि उद्या रविवारी त्यामध्ये मोठी वाढ होईल असा अंदाज आहे. या सिनेमाला काल सकाळी म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र संध्याकाळनंतर या सिनेमाचे शो बुक होऊ लागले.

दुसरीकडे ठाकरे या सिनेमाबाबत काल राज्यभरात उत्सुकता पाहायला मिळाली. मुंबईतील बहुतेक सर्व थिएटर शिवसैनिकांकडून बुक करण्यात आली होती. ठाकरे हा सिनेमा मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आहे. दोन्ही भाषांमधील सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं काल पाहायला मिळालं. मुंबईतच नव्हे तर राज्यभरात हा प्रतिसाद दिसत होता. त्यामुळे ठाकरे सिनेमाने पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला याकडे सर्वांचं लक्ष आहे. ठाकरे सिनेमाचं बजेट सुमारे 20 ते 25 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा सिनेमा किती कोटी रुपये कमावणार याबाबत उत्सुकता आहे. ठाकरे सिनेमाच्या कमाईचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. व्हायाकोम 18 च्या मते ठाकरे सिनेमाने जवळपास 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

ठाकरे सिनेमाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या 

कंगनाचा मणिकर्णिका ठाकरे सिनेमावर भारी, पहिल्या दिवसाची कमाई….

‘मणिकर्णिका’ची पहिल्या दिवसाची कमाई 8.75 कोटी, ‘ठाकरे’ची किती?

REVIEW : मणिकर्णिका… दमदार आणि लाजवाब!  

कंगना राणावतवर अॅसिड फेकू : करणी सेना 

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.