कंगना राणावतवर अॅसिड फेकू : करणी सेना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमावरुन आता प्रचंड वादाला सुरुवात झाली आहे. कारण करणी सेनने कंगना राणावतला थेट अॅसिड हल्ल्याचा इशार दिला आहे. “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन” असा इशारा कंगनाने दिला होता. त्यावर ‘टीव्ही 9 मराठी’ने करणी सेनेच्या अजयसिंह सेनगर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी …

कंगना राणावतवर अॅसिड फेकू : करणी सेना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमावरुन आता प्रचंड वादाला सुरुवात झाली आहे. कारण करणी सेनने कंगना राणावतला थेट अॅसिड हल्ल्याचा इशार दिला आहे. “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन” असा इशारा कंगनाने दिला होता. त्यावर ‘टीव्ही 9 मराठी’ने करणी सेनेच्या अजयसिंह सेनगर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी सेनगर यांनी कंगनाला थेट धमकी दिली. करणी सेनेने कंगनाला प्रत्युत्तर देताना अॅसिड हल्ल्याचा इशारा दिला.

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये झाशीच्या राणीचं नृत्य दाखवलं आहे. आम्ही जिला राजमाता म्हणतो, तिला नृत्य करताना का दाखवलं? राजमाता कधी नृत्य करतात का? शिवाय झाशीच्या राणीचं प्रेमप्रकरण दाखवलं आहे. टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही हिंदू धर्माचा वापर करणार का? हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कंगना म्हणते मी सुद्धा राजपूत आहे, हात पाय तोडून टाकू. पण कंगनाची हिम्मत काय? आम्ही जातीपेक्षा हिंदू धर्माला मानतो. हिंदू धर्माचा जर अपमान केला, तर तुझ्या चेहऱ्यावर आम्ही असिड फेकू” असं अजयसिंह सेनगर म्हणाले.

कंगना राणावत काय म्हणाली?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’ सिनेमावरही आक्षेप घेतला आहे. पण कंगना राणावतनेही राजपूत समाजाच्या करणी सेनेला जसास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन”

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (Manikarnika: The Queen Of Jhansi) हा सिनेमा पुढील शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतली आहे. त्यामुळे कोणीही रोखू शकत नाही, असं कंगनाने सुनावलं.

“चार इतिहासकारांनी ‘मणिकर्णिका’ला प्रमाणपत्र दिलं आहे. शिवाय सेन्सॉर बोर्डानेही हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही करणी सेनावाले त्रास देत आहेत. जर त्यांनी हे बंद केलं नाही, तर त्यांना माहित नाही की मी सुद्धा राजपूत आहे. मी सर्वांना बर्बाद करेन”, असा थेट इशारा कंगनाने दिला.

संबंधीत बातम्या :

Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *