Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा

Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’ सिनेमावरही आक्षेप घेतला आहे. पण कंगना राणावतनेही राजपूत समाजाच्या करणी सेनेला जसास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, “मी सुद्धा राजपूत आहे. जर सिनेमा प्रदर्शनादरम्यान व्यत्यय आणला तर बर्बाद करेन”

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (Manikarnika: The Queen Of Jhansi) हा सिनेमा पुढील शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतली आहे. त्यामुळे कोणीही रोखू शकत नाही, असं कंगनाने सुनावलं.

“चार इतिहासकारांनी ‘मणिकर्णिका’ला प्रमाणपत्र दिलं आहे. शिवाय सेन्सॉर बोर्डानेही हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही करणी सेनावाले त्रास देत आहेत. जर त्यांनी हे बंद केलं नाही, तर त्यांना माहित नाही की मी सुद्धा राजपूत आहे. मी सर्वांना बर्बाद करेन”, असा थेट इशारा कंगनाने दिला.

मै अपनी झांसी नही दूंगी म्हणत ईस्ट इंडिया कंपनीविरोधात थेट लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा सिनेमा आहे. कंगना राणावतने या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे.

करणी सेनेचा आक्षेप काय?

करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्यास किंवा ब्रिटीशांबद्दल प्रेम दाखवल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.

VIDEO : मैं अपनी झांसी नहीं दूँगी, कंगनाच्या ‘मणिकर्ण‍िका’चा दमदार ट्रेलर

 

Published On - 2:56 pm, Fri, 18 January 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI