मनमाडच्या वृद्ध महिलेला हायव्होल्टेज धक्का, एका महिन्याचं बिल तब्बल…

| Updated on: Nov 09, 2020 | 7:47 AM

यामुळे मनमाडमधील त्या वृद्ध महिलेला हायव्होल्टेजचा धक्का बसला आहे. (Manmad Older Women get 1 Lakh Rupees Lockdown Electricity Bill)  

मनमाडच्या वृद्ध महिलेला हायव्होल्टेज धक्का, एका महिन्याचं बिल तब्बल...
Follow us on

मनमाड : गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांना लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा बील आल्याने ती भरायची कशी असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडला आहे. नुकतंच मनमाडमध्ये एक वृद्ध महिलेला वीज कंपनीने चक्क 1 लाख 18 हजार रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. यामुळे त्या महिलेला हायव्होल्टेजचा धक्का बसला आहे. (Manmad Older Women get 1 Lakh Rupees Lockdown Electricity Bill)

आशाबाई चिंतामण गांगुर्डे असे वाढीव वीजबिल आलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मनमाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या मुलींसह राहतात. पतीच्या निधनानंतर त्यांच्या 7 हजार रुपयांच्या सेवा निवृत्ती वेतानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना दर महिन्याला 800 ते 1000 रुपये वीजबिल येते. ते हे बिल नियमितपणे भरतात.

मात्र सप्टेंबर महिन्यात त्यांना चक्क 1 लाख 18 हजार रुपयांचे वीजबिल पाठवण्यात आले. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढं वीजबिल पाहून त्यांना हाय व्होल्टेज विजेचा धक्काच बसला आहे.

याप्रकरणी आशाबाई गांगुर्डे आणि त्यांच्या मुलीने वीज कंपनीकडे दाद मागितली असता, अद्याप त्यांना काहीही दिलासा मिळालेला नाही. त्यानंतर अखेर त्यांना वाढीव वीजबिल कमी करण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला. यानंतरही संबंधित कंपनीने ग्राहकाची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची योग्य ती तपासणी करुन त्यांना वीजबिल देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलं आहे.

दरम्यान राज्यातील अनेक वीज कंपनींच्या या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत असत आहे. अव्वाच्या सव्वा बिले पाठवून त्यांना विजेचा हायव्होल्टेज झटका दिला जात आहे. त्यामुळे ही वाढीव वीजबिलं कमी करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. (Manmad Older Women get 1 Lakh Rupees Lockdown Electricity Bill)

संबंधित बातम्या : 

कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही, अनिल परब यांचं आश्वासन

वाढीव वीजबिलाची फाईल अर्थ खात्याकडे, दिवाळीपर्यंत नागरिकांना गोड बातमी मिळेल, ऊर्जामंत्र्यांचे संकेत