मराठा आरक्षणासाठी आता रथयात्रा निघणार; 28 नोव्हेंबरला आंदोलक मुंबईकडे कूच करणार

| Updated on: Nov 23, 2020 | 9:34 PM

कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे. | Mashal Rath yatra

मराठा आरक्षणासाठी आता रथयात्रा निघणार; 28 नोव्हेंबरला आंदोलक मुंबईकडे कूच करणार
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) मशाल रथयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद ते मुंबईतील आझाद मैदान अशी ही रथयात्रा असेल. येत्या 28 तारखेला ही मशाल रथयात्रा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने कूच करेल. कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने राज्य सरकार या रथयात्रेला परवानगी नाकारण्याची शक्यता अधिक आहे. ( Maratha Mashal Rath yatra on 28th November Aurangabad to Azad Maidan)

यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता सरकार मराठा आंदोलकांचा रोष कसा हाताळणार, हे पाहावे लागेल.

तत्पूर्वी सोमवारी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणांसंदर्भात वक्तव्य केले. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

संबंधित बातम्या:

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

( Maratha Mashal Rath yatra on 28th November Aurangabad to Azad Maidan)