आरक्षणाच्या लढाईचे नवे पर्व, ‘मराठा आंदोलन 2020’ ची घोषणा

| Updated on: Sep 22, 2020 | 3:52 PM

मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता नव्या आंदोलनाची घोषणा केलीय. मराठा आंदोलन २०२० या नावाने हे नवे पर्व असणार आहे, अशी माहिती मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. Maratha Kranti Thok Morcha Declared Martha Agitation 2020

आरक्षणाच्या लढाईचे नवे पर्व, मराठा आंदोलन 2020 ची घोषणा
आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चा
Follow us on

उस्मानाबाद- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता नव्या आंदोलनाची घोषणा केलीय. मराठा आंदोलन २०२० या नावाने हे नवे पर्व असणार आहे, अशी माहिती मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. (Maratha Kranti Thok Morcha Declared Martha Agitation 2020)

मराठा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिक्षण, पीएच.डी यामध्ये आरक्षण कसे मिळेल, याबाबचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी यापूर्वी मूक मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा अशी आंदोलन केली आहेत. आता आरक्षणाच्या लढाईचे तिसरे पर्व सुरू होणार, असून ही आरपारची लढाई असेल, असे आबासाहेब पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी बातचित करताना सांगितले.

जर सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आता आमची लढाई सुरू करावी लागेल, असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मराठा आंदोलन 2020 कशा प्रकारे करण्यात येईल, त्याची काय रणनिती असेल हे सध्या माध्यमातून जाहीर करणार नाही, असेही पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या लढाई संदर्भातील प्रत्येक गोष्ट माध्यमातून जाहीर करणार नाही. मात्र, वेळ आल्यावर कळेलच अशी भूमिका पाटील यांननी व्यक्त केली. सरकारने आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका घ्यावी. आता आरक्षणासाठी आरपारची लढाई असेल, सरकारने निर्णय घेतले नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

(Maratha Kranti Thok Morcha Declared Martha Agitation 2020)

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायलयात याचिका

मराठा आरक्षण कुणाला नकोय?; ‘त्या’ नेत्यांची नावं सांगा; अशोक चव्हाणांचं चंद्रकांतदादांना आव्हान

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज : अशोक चव्हाण