उदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द

| Updated on: Oct 30, 2020 | 10:30 AM

उदयनराजेंनी निरोप दिल्यानंतर पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

उदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द
Follow us on

पुणे : पुण्यात आयोजित केलेली मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. बैठक रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Maratha Reservation Summit organized by MP Udayanraje Bhosle cancelled)

उदयनराजेंनी निरोप दिल्यानंतर पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यात मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.

पुण्यातील रेसिडनसी क्लबमध्ये आज (शुक्रवार 30 ऑक्टोबर) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन ते पाच या वेळेत मराठा आरक्षणाबाबत मंथन करण्यात येणार होते.

मराठा आरक्षण परिषदेला याचिकाकर्ते आणि काही वकिलांचीही उपस्थिती असणार होती. उदयनराजे मराठा आरक्षणाची सद्यस्थिती समजून घेणार होते. मात्र आता ही बैठक कधी होणार, हे अस्पष्ट आहे.

हेही वाचा : …तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले 

याआधी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी नवी मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण बैठकीला भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचले होते, तर उदयनराजे भोसले यांनी दांडी मारली होती. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये या बैठकीचं आयोजन केलं होतं.

“गुणवत्तेनुसार आरक्षण द्या”

दुसरीकडे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. (Maratha Reservation Summit organized by MP Udayanraje Bhosle cancelled)

मातोश्रीवर मशाल मोर्चा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणावरुन आंदोलक आक्रमक; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी; संभाजीराजेंची हजेरी!

(Maratha Reservation Summit organized by MP Udayanraje Bhosle cancelled)