Hemangi Kavi | ‘नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला…’, अभिनेत्री हेमांगी कवीची दिवाळी ‘हक्काच्या घरात’!

यावर्षीची दिवाळी हेमांगीने तिच्या हक्काच्या घरात साजरी केली आहे.

Hemangi Kavi | ‘नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला...’, अभिनेत्री हेमांगी कवीची दिवाळी ‘हक्काच्या घरात’!
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 5:14 PM

मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने आपल्यापैकी अनेक लोकांनी नवीन वस्तूंची खरेदी केलेली आहे. कुठलीही नवीन गोष्ट खरेदी करण्यासाठी आपण बऱ्याचदा दिवाळीचा मुहूर्त साधतो. दिवाळीच्या निमित्ताने अनेकांच्या घरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. मात्र, मराठी अभिनेत्री हेमांगी कवीची (Marathi Actress Hemangi Kavi) यंदाची दिवाळी जरा अधिकच खास आहे. हेमांगी आणि तिच्या पतीच्या ‘दिवाळी आनंदा’चे कारणही तसे वेगळे आहे. यावर्षीची दिवाळी हेमांगीने तिच्या हक्काच्या घरात साजरी केली आहे (Marathi Actress Hemangi Kavi Celebrating Diwali In Her New House).

यंदा दिवाळीच्या निमित्ताने हेमांगी तिच्या नव्या घरात दिवाळी आणि पाडवा साजरा करत आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांनी या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. मात्र कामाच्या गडबडीत या नव्या घरात निवांत वेळ घालवता आला नाही. म्हणून, यंदाची दिवाळी या नव्या घरात साजरा करण्याचे हेमांगी आणि पतीने ठरवले होते. आपली आनंदाची बातमी सांगत, हेमांगीने या नव्या घरातील दिवाळीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेमंगीची खास पोस्ट…

हेमांगी कवी या पोस्टमध्ये लिहीते, “नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला..क्षण एकच पण नाविण्याचा झाला. मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग ‘म्हाडा’ मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची 2016 मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर 2019 उजाडलं. पझेशन चे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारी मध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात ‘गृहप्रवेश’ केला!” (Marathi Actress Hemangi Kavi Celebrating Diwali In Her New House)

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi (@hemangiikavi)

(Marathi Actress Hemangi Kavi Celebrating Diwali In Her New House)

या नव्या घरकुलात वेळ घालवण्यासाठी आणि खास सेलिब्रेशनसाठी दोघांनी दिवाळीचे निमित्त शोधले. पाडवाही त्यांनी या नव्या घरात साजरा केला. हेमांगी पुढे लिहीते की, “खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत.पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही बिझी असलो तरी ‘दिवाळी’ सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं. यंदाची आमची दिवाळी, आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा करतोय! तुमचे आशीर्वाद असू द्यात!”

(Marathi Actress Hemangi Kavi Celebrating Diwali In Her New House)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.