अल्पवयीन तरुणाला शारीरिक संबंधांसाठी बळजबरी, विवाहितेवर गुन्हा

'तू केलेल्या गैरवर्तनाविषयी मी तुझ्या भावाला सांगेन' अशी धमकी देत संशयित आरोपी महिलेने स्वत:शी शरीरसंबंध ठेवण्यास अल्पवयीन तरुणाला भाग पाडले Woman Forces Minor for Physical Relations

अल्पवयीन तरुणाला शारीरिक संबंधांसाठी बळजबरी, विवाहितेवर गुन्हा
| Updated on: Jun 22, 2021 | 11:02 AM

सातारा : अल्पवयीन तरुणाला धमकी देऊन विवाहितेने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. संशयित आरोपी महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Woman Forces Minor for Physical Relations)

पीडित 15 वर्षीय तरुण साताऱ्यात राहणाऱ्या मावशीकडे गावच्या यात्रेसाठी आला होता. त्यावेळी आरोपी महिलेला तरुणाचा अनवधानाने धक्‍का लागला. मात्र महिलेने घरी आल्यावर पीडिताने जाणीवपूर्वक धक्‍का दिल्याचा आरोप केला.

‘तू केलेल्या गैरवर्तनाविषयी मी तुझ्या भावाला सांगेन’ अशी धमकी देत संशयित आरोपी महिलेने स्वत:शी शरीरसंबंध ठेवण्यास आपल्याला भाग पाडले, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. शरीरसंबंध झाल्यानंतर त्याची वाच्यता न करण्याची धमकी दिली.

काही दिवसानंतर पुन्हा संशयित आरोपी महिलेने पीडित मुलाला संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या मावशीला सांगितला.

हेही वाचा : बेडरुममध्ये प्रियकर-प्रेयसी, अचानक आई आल्याने तरुणीची खिडकीतून खाली उडी

याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Woman Forces Minor for Physical Relations)