मुंबईत पुन्हा 50 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त, कुर्ला परिसरातून महिलेला अटक

| Updated on: Nov 30, 2020 | 3:52 PM

कुर्ला परिसरातील सबिनाला येथे तब्बल 50 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. (drug seized in mumbai)

मुंबईत पुन्हा 50 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त, कुर्ला परिसरातून महिलेला अटक
Follow us on

मुंबई : शहरात अमली पदार्थाची तस्करी आणि सेवनाचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. कुर्ला परिसरातील सबिनाला येथे तब्बल 50 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने केली. जप्त केलेल्या या ड्रग्जचे वजन एकूण 503 ग्रॅम आहे.  या कारवाईत पोलिसांनी सबिना खान या महिलेला अटक केली आहे. (MD drug has been seized from kurla in mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसारातील सबिनाला परिसरात एमडी या ड्रग्जची तस्करी होत असल्याचे मुंबई पोलिसांना समजले. ही माहिती समाजताच पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर अमली पदार्थ विरोधीपथकाने जप्तीची कारवाई करत कुर्ला परिसारातून 503 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने सबिना खान या महिला आरोपीला अटक केली. या ड्रग्जची किंमत बाजारमूल्यानुसार 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी सबिना खान या आरोपीला अटक केल्यानंतर तिच्याकडून ड्रग्जदेखील जप्त केला आहे. पोलिसांकूडन या महिला आरोपीची कसून चौकशी होत आहे. या महिलेकडून ड्रग्ज तस्कारांची मोठे रॅकेट उघडे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरळी पोलीस ठाण्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पाच दिवसांपूर्वी 18 कोटींचे कोकेन जप्त

मुंबईत डीआरआय विभागाने पाच दिवसांपूर्वी अशीच एक मोठी कारवाई केली होती. या कारवाईत डीआरआय विभागाने तब्बल 18 कोटींचे कोकेन जप्त केले होते. यावेळी डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पश्चिम आफ्रिकेच्या एका ड्रग्ज तस्कराला अटक केले होते.

डीआरआय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुबईतील ड्रग्ज तस्कर आपल्यासोबत कोकेन घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या डीआरआयच्या विभागाला मिळाली ही. हे कळताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानंतर ड्रग्ज तस्कर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

तस्कराकडे तब्बल 18 कोटींचे कोकेन

डीआरआयच्या आधिकाऱ्यांनी तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडचे 2 किलो 935 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश

नवी मुंबईत ड्रग्स माफिया सक्रीय, ड्रग्सचा व्यापार वाढण्याची कारणं काय?

मुंबई पोलिसांची धडक कारवाई, 19 महिन्यात 1081 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 1073 आरोपींना अटक

(MD drug has been seized from kurla in mumbai)