मेडिकल परीक्षेत नापास, गर्लफ्रेंडला पठ्ठ्या म्हणतो तुझ्यामुळे झालं, फी चे पैसे दे!

ओरंगाबाद : औरंगाबादमध्ये पोलिसांनी एका 21 वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक केली. हा विद्यार्थी मेडिकलच्या पहिल्यावर्षी परीक्षेत नापास झाला आणि नापास झाल्याचे खापर त्याने आपल्या प्रेयसीवर फोडले. नापास झालेला विद्यार्थी उदास झाल्यामुळे त्याने आपल्या प्रेयसीला जबाबदार ठरवत पहिल्या वर्षाची फी तू द्यावी, असा हट्ट त्याने आपल्या प्रेयसीकडे केला. बीड जिल्ह्यातील या विद्यार्थ्याने गेल्यावर्षी औरंगाबादच्या कॉलेजमध्ये बीएचएमएससाठी […]

मेडिकल परीक्षेत नापास, गर्लफ्रेंडला पठ्ठ्या म्हणतो तुझ्यामुळे झालं, फी चे पैसे दे!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

ओरंगाबाद : औरंगाबादमध्ये पोलिसांनी एका 21 वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक केली. हा विद्यार्थी मेडिकलच्या पहिल्यावर्षी परीक्षेत नापास झाला आणि नापास झाल्याचे खापर त्याने आपल्या प्रेयसीवर फोडले. नापास झालेला विद्यार्थी उदास झाल्यामुळे त्याने आपल्या प्रेयसीला जबाबदार ठरवत पहिल्या वर्षाची फी तू द्यावी, असा हट्ट त्याने आपल्या प्रेयसीकडे केला.

बीड जिल्ह्यातील या विद्यार्थ्याने गेल्यावर्षी औरंगाबादच्या कॉलेजमध्ये बीएचएमएससाठी प्रवेश घेतला होता. यावेळी त्याच्या वर्गातील एका विद्यार्थीनीसोबत त्याचे प्रेमसंबध जुळले. विद्यार्थी अभ्यासात खूप हुशार होता, पण त्याचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे तो पहिल्यावर्षी परीक्षेत नापास झाला.

पहिल्या वर्षात नापास झाल्यामुळे तो दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊ शकत नाही. यामुळे तो खूप उदास झाला होता. मी माझ्या प्रेयसीमुळे नापास झालो आणि माझ्या पहिल्या वर्षाची फी तुझ्या कुटुंबाने भरावी, असं त्याने आपल्या प्रेयसीला सांगितले. यामुळे प्रेयसीने त्याच्याशी बोलणं बंद केलं. आरोपी मुलगा मुलीला सतत मेसेज आणि फोन करुन त्रास देत होता.

दररोजच्या त्रासाला कंटाळून मुलगी दुर्लक्ष करु लागली. यानंतर मुलाने सोशल मीडियावरुन तिच्या परिवाराबद्दल पोस्ट लिहू लागला. त्याने मुलीला धमकी दिली की, तुझे फोटोही सोशल मीडियावर अपलोड करेन. या त्रासाला कंटाळून मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कारवाई करत त्याला अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.