AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Suicide | कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात (MNS On Sushant Singh Rajput Suicide) आहे.

Sushant Singh Rajput Suicide | कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा
| Updated on: Jun 19, 2020 | 6:33 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. “सुशांतचा बळी जाण्याचे काही कारण नव्हते, मात्र जर अशाप्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करत असेल, तर मनसेच्या वतीने त्यांना दणके देण्यात येतील,” अशा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. (MNS On Sushant Singh Rajput Suicide)

“सुशांत सिंह राजपूतचा बळी जाण्याचे काहीही कारण नव्हते. मात्र जर अशाप्रकारे आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त करत असेल तर मनसेची चित्रपट सेना त्यावर काम करत आहे. हे असे प्रकार वेळीच न थांबल्यास अशाप्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे प्रेक्षक म्हणून चित्रपट न पाहणे किंवा त्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणे, अशा प्रकारचे दणके देण्यात येतील, अशा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. सुदैवाने असे प्रकारे मराठी सिनेसृष्टीत घडत नाही, याबद्दल पानसेंनी समाधान व्यक्त केलं.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न देखील उपस्थितीत झाले आहे. यासंदर्भात काहींची चौकशी देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेनेदेखील आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे.

ठाण्यात एका वेगळ्या विषयावर मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती . त्यावेळी पानसे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींवर आपले मत व्यक्त केले.

“सुशांतची आत्महत्या म्हणजे हा सर्व प्रकार क्लेशदायक आहे. खऱ्या कलाकाराचं प्रेम हे पैसे आणि इतर गोष्टींपेक्षा कलेवर जास्त असतं. जर त्याला ते करु दिलं नाही, तर त्याचा स्फोट होतोच. एखाद्याचा बदला म्हणून त्याला इंडस्ट्रीच्या बाहेर काढणे हा गुन्हा आहे. जे चांगले काम करतात त्यांना संधी मिळाली पाहिजे. हिंदीमध्ये असे प्रकार होणे खूप दुर्दैवी आहे,” असे अभिजीत पानसे म्हणाले.

“तसेच जर हे प्रकार वेळीच न थांबल्यास मनसे आपल्या पद्धतीने दणका देईल,” यासाठी मनसे नेते अमेय खोपकर यांच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले असल्याचे पानसे यांनी स्पष्ट केले आहे.(MNS On Sushant Singh Rajput Suicide)

संबंधित बातम्या : 

Rhea Chakraborty Interrogation | “6 जूनपासून सुशांतच्या घरी होते, नंतर त्याने जायला सांगितलं, थेट आत्महत्येचं वृत्त आलं” रिया चक्रवर्तीचा जबाब

Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.