AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray :…तरच निवडणूक आयोगाचं सत्य बाहेर येईल, ऐन गणेश विसर्जनाच्या धामधुमीत राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी

निवडणूक आयोगातील दुफळी निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणावरून अनेक धक्कादायक दावे करण्यात येत आहे. यानंतर आता राज ठाकरेंनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

Raj Thackeray :...तरच निवडणूक आयोगाचं सत्य बाहेर येईल, ऐन गणेश विसर्जनाच्या धामधुमीत राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी
raj thackerayImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 11:19 AM
Share

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची दोन दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहे. निवडणूक आयोगातील मतभेदाच्या आरोपानंतर आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. विरोधकांनी आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर सीजीपे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोठी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी एसआयआरची संपूर्ण प्रक्रिया रद्द केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. राज ठाकरेंनी सर्व विरोधकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला विरोधक प्रतिसाद देतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

राज ठाकरे म्हणाले, ‘ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो , गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे’.

‘एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा. तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे. तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल, असे ते पुढे म्हणाले.

Follow Us
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम