हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

| Updated on: Oct 02, 2020 | 3:49 PM

उत्तरप्रदेश येथे घडलेल्या भयानक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबावर स्थानिक प्रशासनाकडून दबाव आणल्याचा आणि धमकावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (MNS protest against threat to victim family of Hathras Rape case).

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक
Follow us on

नवी मुंबई : उत्तरप्रदेश येथे घडलेल्या भयानक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबावर स्थानिक प्रशासनाकडून दबाव आणल्याचा आणि धमकावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (MNS protest against threat to victim family of Hathras Rape case). आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली आहे. मनसेने नवी मुंबईतील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्तरप्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली.

हाथरसच्या पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी ‘यूपी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत निषेध नोंदवला. तसेच पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. यावेळी मनसेचे आनंद चौगुले, विलास घोणे (सचिव), प्रशांत पाटेकर (सहसचिव), गोपीचंद पाटेकर, विक्रांत मालुसरे, दिपाली ढवुळ (उपाध्यक्ष) आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पीडित कुटुंबाला धमकीच्या व्हिडीओत नेमकं काय?

हाथरसचे डीएम पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडियोही व्हायरल होतोय. यात डीएम पीडित कुटुंबाला म्हणत आहेत, “तुम्ही तुमची विश्वासार्हता संपवू नका. हे मीडियावाले आज अर्धे निघून गेले आहेत उद्या बाकीचे निघून जातील. त्यानंतर आम्हीच तुमच्या सोबत राहणार आहोत. त्यामुळे तुमची इच्छा आहे तुम्हाला वारंवार तुमचा जबाब बदलायचा आहे की नाही? तेव्हा वारंवार वक्तव्य बदलायची का ते तुम्ही ठरवा. आम्ही पण बदलू शकतो. असं डीएम म्हणताना स्पष्ट दिसतंय.”

हाथरस सीमेवर अजूनही संघर्ष सुरुच

दरम्यान, हाथरस सीमेवर अजूनही संघर्ष सुरुच आहे. पीडितेच्या गावात कोणीही जाऊ नये यासाठी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे माध्यमं आणि नेते पीडितेच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी ठाम आहेत. वादविवाद आणि संघर्ष सुरुच आहे. काहींनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुपारनंतर त्या गावालाही बॅरिकेड लावण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Rahul Gandhi Hathras Live Update | “इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा”

नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी: राऊत

Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

संबंधित व्हिडीओ :

MNS protest against threat to victim family of Hathras Rape case