Rahul Gandhi Hathras Live Update | "इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा"

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी संताप व्यक्त करत इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है न डरेगा और न ही रुकेगा, असं ट्विट केलं. (Rajeev Satav On Up Police And Yogi Goverment)

Rahul Gandhi Hathras Live Update | "इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा"

मुंबई/ नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी संताप व्यक्त करत इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है न डरेगा और न ही रुकेगा, असं ट्विट केलं. (Rajeev Satav On Up Police And Yogi Goverment)

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसंच राहुल गांधी यांची कॉलर पकडून ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासोबत केलेल्या वर्तनानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी तसंच इतरही नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.

Picture

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची यूपी पोलिसांकडून सुटका

01/10/2020,5:39PM

राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध, मुंबईत गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन

Picture

राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की लोकशाहीचा गळा घोटणारी : विजय वडेट्टीवार

राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. यामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. मोदी-योगी ही जोडगोळी राहुल गांधींना घाबरले असल्याचे आताच्या प्रकाराने स्पष्ट झालंय, असं वडेट्टीवार म्हणाले.

01/10/2020,5:33PM
Picture

उत्तर प्रदेशात जंगलराज, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

राहुल गांधींसोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

01/10/2020,5:32PM
Picture

राहुल गांधी- प्रियंका गांधींना यू.पी. सरकारने अडवणं चुकीचं - गृहमंत्री अनिल देशमुख

01/10/2020,4:38PM
Picture

राहुल गांधींसोबत यूपी पोलिसांचं बेशिस्त वर्तन- शरद पवार

01/10/2020,4:40PM
Picture

राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना धीर द्यायला निघालेले, त्यांना का रोखलं?, योगी नेमकं कशाला घाबरतायेत- पृथ्वीराज चव्हाण

01/10/2020,4:45PM
Picture

इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है न डरेगा और न ही रुकेगा- राजीव सातव

01/10/2020,4:47PM

(Rajeev Satav On Up Police And Yogi Goverment)

संबंधित बातम्या

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

Hathras Gang Rape Protest | कॉलर पकडून खेचाखेची ते धक्काबुक्की, राहुल गांधी जमिनीवर कोसळले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *