VIDEO: आसाममध्ये गोमांस विकल्याच्या संशयावरुन मुस्लीम वृद्धाला बेदम मारहाण

VIDEO: आसाममध्ये गोमांस विकल्याच्या संशयावरुन मुस्लीम वृद्धाला बेदम मारहाण


विश्वनाथ: आसामच्या (Assam) विश्वनाथ जिल्ह्यात कथितपणे गोमांस (Beef) विकल्याच्या संशयावरुन 68 वर्षीय एका मुस्लीम वृद्धाला मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संबंधित व्यक्ती गुडघ्यावर बसलेला दिसत असून जमावाकडे सोडण्याची विनवणी करत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीचे नाव शौकत अली आहे. ही घटना 7 एप्रिलला आसामच्या विस्वनाथ चाराली येथे घडली. व्हायरल व्हिडीओत दिसत आहे, की जमाव अली यांना अनेक प्रश्न विचारत आहे. त्यापैकी ते बांगलादेशी आहे का? गोमांस विकण्याचा परवाना आहे का? त्यांच्याकडे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे प्रमाणपत्र आहे का? या प्रश्नांचा समावेश आहे.

डुकराचे मांसही खायला भाग पाडले

या ठिकाणी जमावाने शौकत अलीवर गोमांस विकण्याचा संशय घेतला आणि मारहाण केली. जमाव एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी अली यांना डुकराचे मांसही खायला भाग पाडले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आसामच्या पोलीस महासंचालकांनी (डीजीपी) सांगितले, ‘या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. एका व्यक्तिला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.’

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली एक व्यापारी आहे. मागील 35 वर्षांपासून तो भोजनालय चालवतो. जमावाने त्याच्यावर आठवडी बाजारात गोमांस विकण्याचा आरोप करत मारहाण केली. शौकत अली जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI