पोटदुखीने त्रस्त तरुणाच्या मूत्राशयात चार्जरची वायर, डॉक्टरही थक्क

| Updated on: Jun 10, 2021 | 6:04 PM

आसाममध्ये एका डॉक्टरांनी शस्त्रक्रिये दरम्यान तरुणाच्या मुत्राशयातू मोबाईलची चार्जरचीवायर काढली (Mobile Charger Wire in stomach) आहे.

पोटदुखीने त्रस्त तरुणाच्या मूत्राशयात चार्जरची वायर, डॉक्टरही थक्क
Follow us on

दिसपूर (आसाम) : आसाममध्ये एका डॉक्टरांनी शस्त्रक्रिये दरम्यान तरुणाच्या मुत्राशयातून मोबाईल चार्जरची वायर काढली (Mobile Charger Wire in stomach) आहे. या घटनेचा व्हिडीओ डॉक्टरांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या सर्वत्र हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाली असून तो आता ठीक (Mobile Charger Wire in stomach) आहे.

गेले काही दिवस तरुणाच्या पोटात दुखत होते. त्यामुळे कुटुबियांनी त्याला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याचे पोट स्कॅन केले पण काही दिसले नाही. त्यानंतर डॉक्टरांनी एक्सरे काढले. एक्सरे काढल्यानंतर सजमले की, तरुणाच्या मुत्राशयात मोबाईल चार्जरची वायर आहे. हे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. दरम्यान, डॉक्टरांनाही प्रश्न पडला की, ही वायर तरुणाच्या पोटात गेली कशी.

25 वर्षातील पहिली घटना

“गेले 25 वर्ष मी शस्त्रक्रिया करत आहे. पण अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच दिसली. रुग्णाच्या पोटातून मोबाईल चार्जरची वायर काढली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओही तुम्ही पाहू शकता. रुग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे. पण रुग्णाची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही”, असं डॉक्टर वलियुल इस्लाम यांनी सांगितले.

Surprises in Surgery! After 25 years of experience in Surgery, I continue to be surprised and shocked by instances…

Posted by Wallie Islam on Wednesday, 3 June 2020

 

संबंधित बातम्या :

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

किडनीचं वजन पाहून डॉक्टरही अवाक, भारतातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया मुंबईत यशस्वी

VIDEO : डॉक्टर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करत होते, महिला वॉयलिन वाजवत होती!